19 April 2025 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Nykaa Share Price | नायका शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांकडून स्टॉक खरेदीचा सल्ला, नवीन टार्गेट प्राईस जाहीर

Nykaa Share Price

Nykaa Share Price | ‘फाल्गुनी नायर’ यांनी स्थापन केलेल्या ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ म्हणजेच ‘नायका’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह व्यवहार करत होते. या शेअर्समध्ये ही पडझड कमजोर तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली होती. डिसेंबर 2022 तिमाहीत ‘नायका’ कंपनीच्या नफ्यात 71 टक्क्यांनी पडझड झाली आणि कंपनीचा नफा 8.48 कोटी रुपयांवर आला होता. रिटेल आउटलेटमधील गुंतवणुकीमुळे कंपनीचा नफा घटला आहे, मात्र तज्ञ अजूनही या स्टॉकवर उत्साही पाहायला मिळत आहेत. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 144.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Fsn E-Commerce Ventures Share Price | Fsn E-Commerce Ventures Stock Price | Nykaa Share Price | Nykaa Stock Price | BSE 543384 | NSE Nykaa)

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
‘नायका’ कंपनीने वाढीच्या शक्य तितक्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, परंतु BPC आणि फॅशन या दोन्ही विभागांसाठी एकूण मार्जिन कमी झाल्यामुळे मॅक्रो आणि डाउन ट्रेडिंगला फटका बसला आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे तज्ञ म्हणाले की, फॅशन सेक्टरमधील संथ वाढ ही मागील बऱ्याच तिमाहींपासून चिंतेची बाब बनली आहे, परंतु वाटचाल सकारात्मक आहे. काही ब्रोकरेज फर्मने ‘नायका’ स्टॉकच्या लक्ष्य किंमतीत किंचित कपात केली आहे, तर ‘नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ने ‘नायका’ स्टॉकवर 250 रुपयांची लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किंमतीपेक्षा 76 टक्के वाढू शकतो.

कंपनीचे स्पष्टीकरण :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे परिचालन उत्पन्न 33 टक्क्यांनी वाढले असून 1,462.82 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील वर्षी डिसेंबर 2021 तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1,098.3 कोटी रुपये होते. कंपनीच्या CEO फाल्गुनी नायर म्हणाल्या की, ‘नायका’ कंपनी सध्या EBITDA मार्जिनपूर्वी कमाई सुधारण्यासाठी मेहनत करत आहे. मागील एका वर्षात ‘नायका’ कंपनीचे शेअर्स 44 टक्के घसरले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price 543384 stock market live on 15 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या