19 November 2024 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Nibe Share Price | अबब! संयमाची जादू! या शेअरने 5 वर्षात 5500% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 56 लाख रुपये

Nibe Share Price

Nibe Share Price | शेअर बाजारात कंपनीची मूलभूत तत्त्वे तपासून पैसे लावणाऱ्या गुंतवणुकदारांना कधीच नुकसान सहन करावे लागत नाही. आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास उच्च परतावा मिळण्याची शक्यता देखील वाढते. संरक्षण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘निबे लिमिटेड’ या कंपनीने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नगा मिळवून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 3159 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत 12 रुपयांवरून वाढून 391 रुपयांवर गेली आहे. गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.33 टक्के वाढीसह 390.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Nibe Share Price | Nibe Stock Price | BSE 535136)

जानेवारी 2023 मध्ये ‘निबे लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरने 404.10 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मात्र त्यानंतर स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकींग सुरू झाली. मागील एका महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 10 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 175 रुपयांवरून वाढून 391 रुपयांवर पोहचली आहे. म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्के परतावा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या या स्टॉकची किंमत फक्त 50 रुपये होती, जी 675 टक्के वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे.

गुंतवणूकदारांची मजबूत कमाई :
ज्या गुंतवणूकदारांनी तीन वर्षांपूर्वी ‘निबे लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांचे नशीब चमकले आहे. तीन वर्षांपूर्वी हा स्टॉक 12 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ज्या लोकांनी तीन वर्षी पूर्वी स्टॉक घेऊन होल्ड केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 32.50 पट अधिक वाढले आहेत. त्याचप्रमाणे मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 5500 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत 7.10 रुपयांवरून वाढून 391 रुपयांवर पोहचली आहे. 5 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 56 लाख रुपये झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nibe Share Price 535136 stock market live on 16 February 2023.

हॅशटॅग्स

Nibe Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x