23 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Tanla Platform Share Price | करोडपती करणारा शेअर आता 61 टक्के स्वस्त झाला आहे, स्टॉक खरेदी करावा का?

Tanla Platform Share price

Tanla Platform Share Price | ‘तानला प्लॅटफॉर्म’ या आयटी क्षेत्राशी संबंधित कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह क्लोज झाले होते. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.37 टक्के वाढीसह 674.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आज ‘तानला प्लॅटफॉर्म’ कंपनीचा शेअर बीएसई निर्देशांकावर 658 रुपयांच्या पातळीवर ओपन झाला होता. तथापि, नंतर स्टॉकमध्ये वाढ झाली आणि शेअरची किंमत 674.80 रुपये किमतीवर पोहचली. या कंपनीचे बाजार भांडवल 8,750 कोटी रुपये आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 61 टक्के कमजोर झाली आहे. या दरम्यान स्टॉक 1692 रुपयांवरून 650 रुपयांपर्यंत खाली आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Tanla Platforms Share Price | Tanla Platforms Stock Price | BSE 532790 | NSE TANLA)

स्टॉकमधील तेजीचे कारण :
27 फेब्रुवारी 2023 रोजी मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात, तानला प्लॅटफॉर्म कंपनी Wisely ATP हा फिशिंग विरोधी तंत्रज्ञान लाँच करणार आहे. नागरिकांची खाजगी माहिती, विश्वासार्ह ब्रँड्स आणि डिजिटल अर्थव्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी Wisely ATP या पहिल्या अँटी-फिशिंग प्लॅटफॉर्मचे अनावरण केले जाणार आहे.

तानला कंपनीच्या मते, एसएमएस फिशिंग घोटाळा हा भारतातील सर्वात मोठ्या सायबर गुन्ह्यांपैकी एका आहे. भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक फिशिंग प्रकरणे नोंदवली जातात, ज्यामुळे लोकांची विविध माध्यमांतून सुमारे 16 अब्ज डॉलर्सची फसवणूक होते. डिसेंबर तिमाहीत तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या निव्वळ नफ्यात 26.3 टक्के घसरण झाली असून कंपनीने 116.51 कोटी रुपये नफा कमावला आहे. कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 1.7 टक्के घसरून 869.63 कोटी रुपयेवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanla Platforms Share Price 532790 stock market live on 17 February 2023.

हॅशटॅग्स

Tanla Platform Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x