22 November 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

राहुल गांधी आज वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरणार

Congress, Rahul Gandhi

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी २ मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. यूपीतील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या २ मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत.

राहुल गांधी आज वायनाड मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी उपस्थित असणार आहेत आणि भव्य रोडशोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वायनाडमध्ये काँग्रेसने रॅलीचे आयोजन केले आहे. याशिवाय, देशातील एकूण 22 शहरांमध्ये काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यावर जाहीर पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते.

राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केल्यापासून हा मतदारसंघ देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. राहुल गांधीच्या उमेदवारीवरून संतापलेल्या डाव्यांनी त्यांना पराभूत करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसेच, CPM च्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख ‘पप्पू’ असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे ‘पप्पू स्ट्राइक’ असल्याचे म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x