23 November 2024 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Medanta Global Health Share Price | कमाईची संधी! 2 दिवसांत या शेअरने 13% परतावा दिला, तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा

Medanta Global Health Share Price

Medanta Global Health Share Price | ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 524 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन दिवसांत या हॉस्पिटल व्यवसायाशी संबंधित कंपनीच्या शेअरची किंमत 13 टक्के वाढली आहे. ‘मेदांता ग्लोबल हेल्थ लिमिटेड’ कंपनीचा IPO नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Global Health Share Price | Global Health Stock Price | BSE 543654 | NSE MEDANTA)

IPO इश्यू डिटेल :
मागील वर्षी 3 नोव्हेंबर 2022 रोजी ‘मेदांता ग्लोबल हेल्थ’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO ची इश्यू किंमत 319-336 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. IPO इश्यू किमतीच्या स्टॉक 54 टक्क्यांच्या वाढीसह सूचीबद्ध झाला होता. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 19 टक्के प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तर 24 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक 487 रुपयांच्या किंमत पातळीवर पोहचला होता.

डिसेंबर तिमाहीचे निकाल :
ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत ‘मेदांता ग्लोबल हेल्थ’ कंपनीने 706.2 कोटी रुपये कमाई केली आहे. वर्ष-दर-वर्ष या आधारावर कंपनीच्या नफ्यात 19.0 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये कंपनीच्या वार्षिक उत्पन्नात 21.2 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 2,027 कोटी रुपये कमाई केली होती. त्यानंतर काही महिने शेअरवर विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत घटली. त्याचप्रमाणे कंपनीचा EBITDA 485.6 कोटी रुपयेवर गेला आहे, ज्यात वार्षिक 22.1 टक्के वाढ पाहायला मिळत आहे.

शेअरची लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडियाने मजबूत तिमाही निकालानंतर ‘मेदांता ग्लोबल हेल्थ’ कंपनीच्या स्टॉकवर 630 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पूर्वी जेएफ फायनान्शिअलने स्टॉकवर 575 रुपये लक्ष किंमत निर्धारित केली होती, जी आता त्यांनी वाढवली आहे. भारतातील प्रसिद्ध कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ नरेश त्रेहान हे ‘मेदांता ग्लोबल हेल्थ’ कंपनीचे संस्थापक आहेत. मेदांता ब्रँड अंतर्गत भारतातील पाच शहरांमध्ये पाच रुग्णालये चालवले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Health Share Price 543654 stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

Medanta Global Health Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x