23 November 2024 1:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Hero Motocorp Share Price | या शेअरने गुंतवणूकदारांना 103 पट परतावा दिला, आता 'या' बातमीने हा शेअर पुन्हा तेजीत येतोय

Hero Motocorp Share Price

Hero Motocorp Share Price | ‘हिरो मोटोकॉर्प’ या दुचाकी आणि तीनचाकी वाहन उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 8 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. दीर्घ कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअरमध्ये दीड टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, ‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 3100 रुपयांपर्यंत वाढू शकतात. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के घसरणीसह 2,531.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Hero Motocorp Share Price | Hero Motocorp Stock Price | BSE 500182 | NSE HEROMOTOCO)

तज्ञांचे स्टॉकबाबत मत :
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘हिरो मॉटोकॉर्प’ कंपनीने 771 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. पुढील तिमाहीत ग्रामीण भागातून जास्त मागणी आली तर दुचाकी उद्योगाचा महसूल FY24 मध्ये दुहेरी अंकी दराने वाढू शकतो असे मत कंपनीच्या व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे. हिरो कंपनीने 125cc आणि स्कूटर्स विभागात ब्बाजारार आपले जुने वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याची योजना आखली आहे. कंपनीने दर तिमाहीत किमान एक नवीन मॉडेल लॉन्च करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. प्रत्येक तिमाहीत एक मॉडेल लॉन्च करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून कंपनीने नुकताच 110cc सेगमेंटमध्ये Xoom लॉन्च केली आहे.

हे सर्व पाहता देशी ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने ‘हिरो मॉटोकॉर्प’ स्टॉकवर बाय रेटिंग दिले आहे. डिसेंबर 2022 तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी मागणी आणि मार्च 2023 तिमाहीचा कमजोर कल दिसत असल्याने तज्ञांनी स्टॉकची लक्ष किंमत कमी केली आहे. तज्ञांचा अंदाज आहे की, हा स्टॉक पुढील तिमाहीपर्यंत 3086 रुपयांवरून 2959 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतो. दुसरीकडे मोतीलाल ओसवाल फर्मने या स्टॉकवर 3,100 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

हिरो मोटोकॉर्प मल्टीबॅगर परतावा :
‘हिरो मोटोकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 1996 रोजी 24.63 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे आता वाढून 2,531.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजे मागील 27 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या एक लाख रुपये गुंतवणुकीचे मूल्य 103 पट अधिक वाढवले आहेत. म्हणजेच हे गुंतवणुकदार आता करोडपती झाले असणार. मागील वर्षी 8 मार्च 2022 रोजी हा स्टॉक 2148 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. अवघ्या पाच महिन्यांत शेअरची किंमत 37 टक्क्यांनी वाढून 18 ऑगस्ट 2022 रोजी 2939.35 रुपयांवर पोहोचली होती. मात्र आता पुन्हा स्टॉक 14 टक्क्यांनी कमजोर झाला असल्याने तज्ञांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक 22 टक्क्यांनी वाढू शकतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hero Motocorp Share Price 500182 HEROMOTOCO stock market live on 20 February 2023.

हॅशटॅग्स

Hero Motocorp Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x