23 November 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! स्वस्त झालेला टाटा स्टीलचा शेअर तेजीत येतोय, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढत आहेत. मागील काही दिवस स्टॉक सुस्त होता मात्र आता शेअर तेजीत धावत आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मगळवर दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.20 टक्के वाढीसह 113.70 रुपये किमतीवर ट्रेड मदत आहेत. 6 एप्रिल 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर 138.63 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर आला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
टाटा स्टील कंपनीचा स्टॉक मागील एका वर्षात 6 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकची किंमत 9 टक्के घसरली आहे. तर मागील दोन वर्षांत टाटा स्टील स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 66.92 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 152.31 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,36,801.87 कोटी रुपये आहे.

स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज फर्म आनंद राठी यांनी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, आणि त्यासाठी त्यांनी 133 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्च फर्मने टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुढील 12 महिन्यांत 130 रुपयांपर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. तर Tips2trade चे तज्ञ स्टॉक पुढील काळात 122-128 रुपये किंमत पातळीवर जाऊ शकतो असे म्हणतात.

डिसेंबर तिमाहीचे निकाल :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत टाटा स्टील कंपनीला 2,502 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या खर्चामुळे कंपनीच्या नफ्यात घसरण झाली असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 9,598.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील तुमहित कंपनीचा महसूल 60,842 कोटी रुपयांवरून कमी झाला असून 57,354 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price return 500470 TATASTEEL stock market live on 21 February 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(118)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x