23 November 2024 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Marico Share Price | गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारा शेअर आता नव्या टार्गेट प्राईसच्या दिशेने झेपावतोय, स्टॉक डिटेल्स पहा

Marico Share Price

Marico Share Price | ऑइल-शॅम्पू सारखे दैनंदिन वापराचे वस्तू बनवणाऱ्या ‘मॅरिको लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी 0.52 टक्के वाढीसह 503.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आता तज्ञांनी या स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, मॅरिको कंपनीचे शेअर्स 560 रुपये पर्यंत वाढू शकतात, जे सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. मॅरिको कंपनीचे अनेक ब्रँड बाजारात प्रसिद्ध आहे, जसे निहार, पॅराशूट ब्रँड ऑइल, लिव्हॉन, हेअर अँड केअर, सिल्क ब्रँड हेअर सीरम, सेट वेट ब्रँड जेल, सफोला ऑइल, ओट्स, पॅराशूट बॉडी लोशन. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Marico Share Price | Marico Stock Price | BSE 531642 | NSE MARICO)

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने मॅरिको कंपनी बाबत चार अंदाज व्यक्त केले आहेत. एक म्हणजे कंपनीचा खोबरेल तेलाच्या वाढत्या विक्रीमुळे कंपनीचा बाजारातील हिस्सा वाढेल. दुसरा म्हणजे प्रीमियम केस तेलांची विक्री वाढल्याने प्रीमियम विभागाचा विस्तार होईल. तिसरा म्हणजे, सफोला खाद्यतेलाची विक्री वाढली असून त्याची बाजारपेठ अधिक विस्तारणार आहे. आणि चौथे म्हणजे, खाद्यपदार्थ विभागातील कंपनीची कमाई आणखी वाढणार आहे. या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कंपनी पूर्ण ताकदीने काम करत आहे, परंतु कमोडिटीच्या किमतीतील अस्थिरता आणि ग्रामीण भागातील मंदी यांच्या कंपनीच्या मेहनती जास्त परिणाम होताना दिसत नाही आहे. तथापि ब्रोकरेज फर्मने विश्वास व्यक्त केला आहे की, कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे आणि दीर्घ काळात जबरदस्त कामगिरी करते. या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने मॅरिको कंपनीच्या स्टॉकवर 560 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

मॅरिकोचा मल्टीबॅगर परतावा :
20 वर्षांपूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी 2003 रोजी मॅरिको कंपनीचे शेअर्स केवळ 4.20 रुपयांवर ट्रेड करत होते. आता शेअरची किंमत 488.70 रुपयेवर पोहचली आहे. म्हणजे मागील 20 वर्षांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 116 पटीने वाढले असून त्यांना 1.16 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. 28 मार्च 2022 रोजी मॅरिकोचा स्टॉक 468.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. अवघ्या सहा महिन्यांत 23 सप्टेंबर 2022 पर्यंत स्टॉकची किंमत 554.05 रुपये या वार्षिक उच्चनक किंमत पातळीवर पोहोचली. तथापि स्टॉक सध्या 12 टक्के स्वस्त किमतीवर उपलब्ध असून पुढील काळात स्टॉक 15 टक्के अधिक वाढू शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Marico Share Price 531642 stock market live on 22 February 2023.

हॅशटॅग्स

Marico Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x