23 November 2024 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Kohinoor Foods Share Price | 6 महिन्यात 246% परतावा, पण आता अदानी ग्रुपने खरेदी केलेल्या कंपनीला फटका, स्टॉकची स्थिती पहा

Kohinoor Foods Share Price

Kohinoor Foods Share Price | मागील एक महिन्यापासून हिँडेनबर्ग संशोधन अहवालामुळे अदानी समूहाच्या समभागांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. अदानी समूहाचे शेअर्स मागील एका महिन्यात 80 टक्के कमजोर झाले आहेत. यात ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्सही सामील आहेत. ‘कोहिनूर फूड्स लिमिटेड’ कंपनीला अदानी समूहाने मागील वर्षी मे 2022 या महिन्यात खरेदी केले होते. त्यानंतर हा स्टॉक एक महिनाभर सतत अप्पर सर्किट हिट करत होता. पण हिंडेनबर्गच्या अहवाल आल्यानंतर अदानी समुहाच्या शेअरवर संकट कोसळले आणि ‘कोहिनूर फूड्स’ कंपनीचे शेअर्स खाली आले. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के वाढीसह 52.80 रूपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Kohinoor Foods Share Price | Kohinoor Foods Stock Price | BSE 512559 | NSE KOHINOOR)

स्टॉकमध्ये 34 टक्के पडझड :
‘कोहिनूर फूड्स’ कंपनचे शेअर्स मागील एका महिन्यात 34 टक्क्यांनी खाली आले आहेत. या दरम्यान हा स्टॉक 79 रुपयांवरून घसरुन सध्याच्या किंमतीवर आला आहे. या वर्षी YTD आधारे स्टॉक 6.33 टक्के घसरला आहे. नाही मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 577.42 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

अदानी समूहाने कंपनी विकत घेतली :
मे 2022 च्या सुरुवातीला ‘अदानी विल्मर लिमिटेड’ कंपनीने ‘McCormick Switzerland GmbH’ कडून कोहिनूर बँडसह कंपनी खरेदी करण्याची घोषणा केली होती. कंपनीने निवेदनात म्हटले होते की, या संपादनामुळे भारतातील कोहिनूर बासमती तांदूळ ब्रँडचे विशेष अधिकार ‘अदानी विल्मर लिमिटेड’ कंपनीला मिळणार आहे. तसेच कोहिनूर ब्रँड अंतर्गत रेडिमेड आणि खाण्यासाठी तयार करी आणि फूड ब्रँड्सचा समावेश आहे. कोहिनूर ब्रँड पोर्टफोलिओ FMCG सेक्टरमध्ये AWL चे स्थान आणखी मजबूत करेल. तांदूळ आणि इतर खाद्य व्यवसायांमध्ये अधिक उत्पादने ऑफर करण्यास अदानी विल्मर आणखी सक्षम होईल.

कोहिनूर फूड्सचा व्यवसाय थोडक्यात :
‘कोहिनूर फूड्स’ ही कंपनी मुख्याह खाद्यपदार्थांच्या उत्पादन, व्यापार आणि विपणन क्षेत्रात व्यवसाय करते. जगभरातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात पुरवठा साखळी तयार केली आहे. ‘कोहिनूर फूड्स’ ब्रँडमध्ये बासमती तांदळाचे विविध प्रकार, खाण्यासाठी तयार करी, रेडिमेड ग्रेव्हीज, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले, फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स, आरोग्यदायी तृणधान्ये, खाद्यतेल, यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kohinoor Foods Share Price 512559 stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

#Kohinoor Foods Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x