मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं राजकीय वजन वाढवायला गेले, आता अदानींच वजन झिरोच्या दिशेने, कनेक्शन जाणून घ्या

Adani Group Crisis | जानेवारी महिन्यात देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी मुंबईत मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्याचे फोटो देखील मीडियापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याभेटीमागे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक आणि शिवसेनेतील फूट याचा संदर्भ होता असं राजकीय विश्लेषकांनी म्हटले होते.
मुंबई संबंधित घडलेल्या उद्योग क्षेत्रातील घडामोडींचं केनेक्शन
मुंबईत राजकीय ‘आकडेवारीत’ ताकद नसलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरेंची गौतम अदानींनी निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर ही भेट घडवून आणण्यामागे भाजप असल्याचं देखील म्हटलं गेलं. मुंबई यासाठी म्हटलं कारण अदानी सर्वकाही बिझनेस अँगलने करतात आणि राज्यात शिंदे सरकार आल्याने मुंबईत अदानी ग्रुप मोठी उलाढाल करणार होता आणि त्याचं थेट कनेक्शन गुजरात, मुंबई बीकेसी आणि डीबी रिअल्टी कंपनी याच्याशी जोडलं गेलं. त्यामुळे अदानी पावर विरोधात आंदोलन करणारे राज ठाकरे आता भविष्यात अदानी यांच्या विरोधात कोणतही आंदोलन करतील हे लोकांनी विसरून जावं. पण विषय केवळ इतकाच नाही, हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे. कारण, कधी बेळगाबाबत विवादित भूमिका, तर कधी वेगळ्या विदर्भाबाबत धक्कादायक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंवर मुंबईबाबत किती विश्वास ठेवावा हाच कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी अदाणींचं पतन होण्याचा काळ आणि त्यापूर्वी मुंबई संबंधित घडलेल्या उद्योग क्षेत्रातील घडामोडींचं केनेक्शन समजणं गरजेचं आहे.
आज २४ फेब्रुवारी ही तारीख भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण आहे. खरं तर बरोबर महिन्याभरापूर्वी याच तारखेला अदानी समूहाचे वाईट दिवस तेव्हा सुरू झाले जेव्हा अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने समूहाविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात ग्रुपवरील शेअर्स आणि कर्जाच्या हेराफेरीबाबत अनेक मोठे खुलासे करण्यात आले होते. त्याचा कहर अशा प्रकारे सुरू झाला की, तो आजतागायत सुरूआहे. अदानींच्या कंपन्यांचे समभाग कोसळले आणि गौतम अदानी अब्जाधीशांच्या यादीत टॉप-४ वरून २९ व्या स्थानावर घसरले.
गेल्या वर्षी अदानींनी कमाल केली होती
सर्वप्रथम हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वी गौतम अदानी यांच्या वर्चस्वाबद्दल बोलूया, तर तुम्हाला सांगू या की, गेल्या वर्षी जगातील सर्व श्रीमंत लोकांच्या तुलनेत अदानी हे एकमेव अब्जाधीश होते ज्यांनी भरपूर पैसा कमावला होता. एलन मस्क, जेफ बेझोस यांच्यापासून मुकेश अंबानींपर्यंत सर्वांना मागे टाकत त्यांनी एका वर्षात आपल्या संपत्तीत ४० अब्ज डॉलरची भर घातली. इतकंच नाही तर टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असला तरी एका दिवसानंतर तो चौथ्या स्थानावर पोहोचला. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपली जागा कायम राखली होती, पण २०२३ हे वर्ष त्यांच्यासाठी आतापर्यंतचे सर्वात वाईट वर्ष ठरले आहे. एकूण आता त्यांचा राष्ट्रीय आणि जागतिक स्थरावरील पणवती टाईम सुरु झाल्याचं आकडेवारी सांगते आहे.
कनेक्टिकट विद्यापीठाचे पदवीधर नॅथन अँडरसन यांची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्गने २४ जानेवारी २०२३ रोजी अदानी समूहाविषयी एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता. फॉरेन्सिक फायनान्शियल रिसर्च फर्मच्या या अहवालात अदानी समूहाबाबत ८८ प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अदानी समूहाच्या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या सात प्रमुख कंपन्यांचे ८५ टक्क्यांहून अधिक ओव्हरव्हॅल्यूड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. म्हणजेच अदानी समूहाच्या शेअर्सची किंमत प्रत्यक्ष किमतीपेक्षा ८५ टक्के जास्त असल्याचा आरोप करण्यात आला होता.
अदानी समूहाच्या एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत १० रुपये असेल आणि हा शेअर ८५ टक्के ओव्हरव्हॅल्यूड असल्याचे म्हटले जात असेल तर त्यानुसार या शेअरची खरी किंमत फक्त १५० रुपये आहे. याशिवाय अदानी समूहावरही प्रचंड कर्जासंदर्भात गंभीर आरोप करण्यात आले होते.
एका महिन्यात अदानीच्या शेअरमध्ये घसरण
२९ जानेवारीरोजी अदानी समूहाने तात्काळ ४०० पानांचे उत्तर जारी करत अहवालातील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत ही कायदेशीर लढाई असल्याचे म्हटले होते. पण समूहाच्या या वक्तव्याचा ही गुंतवणूकदारांच्या भावनेवर कोणताही परिणाम होऊ शकला नाही. गेल्या महिन्याभरात अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अशी त्सुनामी आली आहे की, शेअर्सचे मूल्य ८५ टक्क्यांनी घसरले आहे. २४ जानेवारीरोजी हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहाचे एकूण बाजार भांडवल १०० अब्ज डॉलरच्या खाली पोहोचले असून त्यात आतापर्यंत १३३ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
तीन मोठ्या डील पैसा नसल्याने हाताबाहेर गेल्या
अदानींच्या शेअर्समधील त्सुनामीमुळे समूहातील बहुतांश कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणात घसरले आहे. अदानी समूहाच्या विश्वासार्हतेवर झालेल्या परिणामाबद्दल बोलायचे झाले तर गौतम अदानी यांनी या एका महिन्यात तीन मोठे सौदे गमावले आहेत. अदानी पॉवर आणि डीबी पॉवर यांच्यातील 7000 कोटी रुपयांचा करार तुटला आणि त्यानंतर अदानी समूहाची पीटीसी इंडियातील भागीदारीसाठी बोली लावण्याची योजना रद्द करण्यात आली. बुधवारी ओरिएंट सिमेंट खरेदीचा करारही रखडला.
डीबी रियल्टीची अदानीसोबत डील आणि मुंबई-गुजरात कनेक्शन:
गौतम अदानी यांच्या उद्योग समूहाची कंपनी असलेल्या ‘अदानी गुडहोम्स’ ने ‘रेडियस इस्टेट्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दिवाळखोर रिअल इस्टेट कंपनीला खरेदी केले आहे. ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या अहवालात, ‘अदानी गुडहोम्स’ कंपनीने या दिवाळखोर कंपनीसाठी कर्जदार ज्या रकमेची मागणी करत होते त्यातून 98 टक्के सवलतीवर बोली लावली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अदानी उद्योग समूहाच्या ‘अदानी गुडहोम्स’ कंपनीने डीबी रियल्टी कंपनीच्या कर्जदारांना 319.7 दशलक्ष रुपयेची ऑफर दिली आहे. रेडियस इस्टेट अँड डेव्हलपर्स आणि एमआयजी वांद्रे रियल्टर्स अँड बिल्डर्स हे डीबी रियल्टीचे संयुक्त उपक्रम आहेत. एमआयजी वांद्रे रियल्टर्स अँड बिल्डर्स ही कंपनी DB Realty ची उपकंपनी आहे. यामुळेच डीबी रियल्टी कंपनीने नुकताच स्टॉक मार्केट नियामक सेबीला सादर केलेल्या कागदपत्रात NCLT ने रेडियस इस्टेटसाठी अदानी गुडहोम्सच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली असल्याची माहिती दिली आहे.
मुंबईत अदानी समूहाला काय फायदा होणार होता?
या खरेदी करारानंतर अदानी समूह बीकेसी मधील 10 प्रकल्प ताब्यात घेऊ शकतात. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स किंवा BKC मध्ये अनेक स्थानिक आणि जागतिक बँकांची मुख्यालये, कार्यालय आहेत. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजेच स्लम एरिया धारावी देखील जवळच आहे. नुकताच धारावी झोपडपट्टीचा विकास करण्यासाठी अदानी समूहाची सर्वात मोठी बोली लावली होती आणि ‘मोदींची माणसं’ म्हणजे शिंदे सरकार सत्तेत येताच पुनर्बांधणीचे कंत्राट अदानीने जिंकले होते. बीकेसी मध्ये चालू असलेला प्रकल्प 5 एकरमध्ये विस्तारलेला आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून 25 अब्ज रुपयांची कमाई होणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच अदाणी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आर्थिक देशोधडीला लागल्याने अनेक योजना आता पैशा अभावी रखडणार हे निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे याच बीकेसीतून गुजरातच्या फायद्याचा मुंबई-अहमदाबाद हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरु करण्याचा मानस असल्याने नेमकं याच कंपनीला त्यांनी का विकत घेतलं याचा अंदाज येऊ शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Adani Group Crisis on global level check details on 24 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA