23 November 2024 6:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Shipping Corporation of India Share Price | सरकारी कंपनीचा शेअर एका बातमीने तेजीत येणार, स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Shipping Corporation of India Share Price

Shipping Corporation of India Share Price | ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी मालकीच्या शिपिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 2.45 टक्के घसरणीसह 123.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. काल हा स्टॉक जबरदस्त तेजीत होता. एका अहवालानंतर शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळाली होती. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ कंपनीच्या सुधारित डिमर्जर योजनेला मंजुरी दिली. या सुधारित योजनेअंतर्गत कंपनीचे 1,000 कोटी रुपये नॉन कोअर मालमत्तांमध्ये हस्तांतरित केले जाणार आहे. हे कंपनीच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुढे नेण्यात मदत करेल आणि कंपनीची निर्गुंतवणूक प्रक्रिया FY24 पर्यंत पूर्ण होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Shipping Corporation of India Share Price | Shipping Corporation of India Stock Price | BSE 523598 | NSE SCI)

डॉमर्जर योजना 2021 मध्ये मंजूर :
स्टॉक एक्सचेंज फाइलिंगनुसार SCI कंपनीच्या संचालक मंडळाने 3 ऑगस्ट 2021 रोजी कंपनीच्या ओळखल्या गेलेल्या नॉन कोर मालमत्ता विभक्त करण्यासाठी डीमर्जर करण्याचा निर्णय घेतला होता. बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाच्या म्हणजेच MOPSW च्या निर्देशांनंतर SCI कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये नॉन-कोअर मालमत्तेच्या विलगीकरणासाठी 100 टक्के मालकीची उपकंपनी ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड अॅसेट्स लिमिटेड’ म्हणजेच ‘SCILAL’ मधे समाविष्ट केले. भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते की, SCI मधील प्रस्तावित धोरणात्मक निर्गुतवणुकीमध्ये कंपनीच्या प्रमुख मालमत्तेची निर्गुंतवणूक आणि कंपनीचे व्यवस्थापन नियंत्रण खरेदीदाराकडे जाईल.

शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी SCI कंपनीचे शेअर्स 2.45 टक्के घसरणीसह 123.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 10 टक्के मजबूत झाले होते. तर या वर्षी YTD आधारे स्टॉकमध्ये 15 टक्के पडझड पाहायला मिळाली.आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 9.72 टक्के खाली आला आहे. तर मागील सहा महिन्यांत शेअरची किंमत समारे 9 टक्के वाढली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट तर्फे जारी केलेल्या आदेशानुसार SCI कंपनीची नॉन कोर मालमत्ता विलिनीकरण प्रक्रियेद्वारे विकली जाणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shipping Corporation of India Share Price 523598 SCI stock market live on 24 February 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x