24 April 2025 4:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसमध्ये 3000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत किती मिळतील? अशी ठरवा बचत रक्कम SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल HDFC Mutual Fund | पगारदार महिना केवळ 1,000 रुपये SIP वर मिळवत आहेत 2 कोटी रुपये परतावा, बिनधास्त पैसा कमवा Horoscope Today | 24 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 24 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN
x

Sanofi India Share Price | या शेअरवर 570 रुपये प्रति शेअर लाभांश, संधीचा फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट तपासून घ्या

Sanofi India Share Price

Sanofi India Share Price | ‘सनोफी इंडिया’ या फार्मा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना खुश खबर दिली आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अंतिम लाभांशासह विशेष लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आह. ही फार्मा कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 377 टक्के लाभांश देणार आहे. ‘Sanofi India’ कंपनीने 194 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 183 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या वर्षात सनोफी इंडिया कंपनीने दुसरा विशेष लाभांश जाहीर केला आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.02 टक्के वाढीसह 5,574.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sanofi India Share Price | Sanofi India Stock Price | BSE 500674 | NSE SANOFI)

अंतिम आणि विशेष लाभांशाची एक्स डेट फिक्स :
‘सनोफी इंडिया’ कंपनी स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान धरे धारकांना 194 रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि 183 रुपये प्रति शेअर विशेष लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीने हा लाभांश 31 डिसेंबर 2022 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी दिला आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनीने अंतिम लाभांश आणि विशेष लाभांशासाठी 28 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला आहे. ‘सनोफी इंडिया’ कंपनी जानेवारी- डिसेंबर हा आर्थिक वर्ष फॉलो करते.

एकूण 570 रुपये लाभांश :
‘सनोफी इंडिया’ कंपनीने यापूर्वी 22 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 193 रुपये विशेष अंतरिम लाभांश वाटप केला होता. 31 डिसेंबर 2022 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 570 रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. अंतिम आणि विशेष लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीला शेअर धारकांची मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता प्राप्त केल्यानंतर कंपनी 22 मे 2023 रोजी किंवा त्यानंतर गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत ‘सनोफी इंडिया’ कंपनीने 691.90 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 130.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sanofi India Share Price 500674 stock market live on 25 February 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanofi India Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या