23 November 2024 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

GAIL India Share Price | या सरकारी कंपनीने बोनस शेअर्स वाटून गुंतवणुकदारांना करोडपती बनवले, बोनस शेअर्सचा इतिहास

GAIL India Share Price

GAIL India Share Price | ‘गेल इंडिया’ या महारत्न दर्जा प्राप्त कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी ‘गेल इंडिया’ कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावून संयम राखला होता, त्यांना या सरकारी मालकीच्या कंपनीने मजबूत फायदा मिळवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.88 कोटी रुपये परतावा मिळाला आहे. बोनस शेअर्समुळे गेल इंडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे. गेल इंडिया कंपनीने 2008 पासून आतापर्यंत शेअर धारकांना एकूण 5 वेळा बोनस शेअर्स वाटप केले आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)

1 लाखावर 1.88 कोटी रुपये परतावा :
26 मे 2000 रोजी ‘गेल इंडिया’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 4.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही त्यावेळी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 22830 शेअर्स मिळाले असते. GAIL India कंपनीने 2008 ते 2022 पर्यंत आपल्या शेअर धारकांना एकूण 5 वेळा मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या कडे गेल इंडिया कंपनीचे एकूण 182640 शेअर्स राहिले असते. 27 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 2.22 टक्के वाढीसह 105.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. अशा स्थितीत तुमच्या सर्व शेअरचे मूल्य वाढून 1.88 कोटी पेक्षा जास्त झाले असते.

गेल इंडिया कंपनीचे शेअर्स आपल्या 8 महिन्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. गेल इंडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर 5 टक्क्यांच्या वाढीसह 103.45 रुपये या आपल्या 8 महिन्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सनी जून 2022 ची उच्चांक किंमत पुन्हा प्राप्त केली आहे. GAIL India कंपनीचे शेअर्स 19 एप्रिल 2022 रोजी 116 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

5 वेळा बोनस शेअर्स वाटप :
गेल इंडिया कंपनी आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 5 वेळा बोनस शेअर वाटप केले आहे. या सरकारी कंपनीने ऑक्टोबर 2008 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यानंतर कंपनीने मार्च 2017 मध्ये 1:3 या प्रमाणात आणि मार्च 2018 मध्ये 1:3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. जुलै 2019 मध्ये गेल इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. नंतर पुन्हा एकदा गेल इंडिया कंपनीने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 1 : 2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GAIL India Share Price 532155 stock market live on 27 February 2023.

हॅशटॅग्स

GAIL India share price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x