23 November 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

PPF Scheme Investment | पीपीएफ योजनेत पैसे गुंतवले आहेत? योजनेत मोठा बदल! माहिती असणं आवश्यक

PPF Scheme Investment

PPF Scheme Investment | जर तुमचे ही पैसे पीपीएफ योजनेत गुंतवले असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून वेळोवेळी सरकारी योजनांबाबत अनेक प्रकारच्या घोषणा केल्या जातात. आता पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आजच्या काळात पीपीएफ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. यामध्ये तुम्हाला जास्त व्याजासह चांगला परतावा मिळतो, पण आता जर तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी तुमच्या पीपीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर जाणून घ्या नियमांमध्ये काय बदल झाले आहेत.

चक्रवाढ व्याजाचे फायदे
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेत कंपाउंडिंगवर आधारित 7.1 टक्के परतावा मिळतो. अनेकदा असं होतं की तुम्ही पैसे गुंतवता, पण इमर्जन्सीमध्ये हे पैसे काढावे लागतात, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे कसे काढू शकता हे सांगणार आहोत.

मॅच्युरिटीपूर्वी खात्यातून पैसे काढू शकतो का?
अनेकवेळा असे दिसून आले आहे की जर तुम्ही वेळेपूर्वी पैसे काढले तर तुम्हाला पैसे काढण्याचे कारण विचारले जाते आणि तरीही तुम्हाला पूर्ण पैसे दिले जात नाहीत. याच्या नियमांनुसार तुम्ही 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढू शकता आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते बंदही करू शकता. जर तुम्हाला 6 वर्षापूर्वी काही पैसे काढायचे असतील तर तुमच्याकडे पैसे काढण्याचे वैध कारण असावे तरच तुम्ही तुमचे पैसे काढू शकता.

पैसे कधी काढू शकतो?
आपल्याकडे पैसे काढण्याचे वैध कारण असणे आवश्यक आहे. जसे तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार घ्यायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उपचारासाठी पैसे काढू शकता. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या लग्नासाठीही तुम्ही पैसे काढू शकता.

पीपीएफ पैसे काढण्याचे नियम
1. पीपीएफमध्ये पैसे काढण्यासाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
2. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून फॉर्म सी डाऊनलोड करावा लागेल.
3. फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करा.
4. आणि तुमचे पीपीएफ खाते बँकेला दाखवा.
5. यानंतर तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम बँक देईल.

याची सुरुवात तुम्ही 500 रुपयांपासून करू शकता
या योजनेत एक व्यक्ती 500 रुपयांपासून सुरुवात करू शकते. तर आर्थिक वर्षात तुम्ही यात जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. इतकंच नाही तर पीपीएफमध्ये तुम्हाला ठराविक कालावधीनंतर लोन आणि अर्धवट पैसे काढण्याची सुविधाही मिळते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PPF Scheme Investment alert check details on 27 February 2023.

हॅशटॅग्स

#PPF Scheme investment(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x