22 November 2024 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये पुन्हा तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER
x

Hot Stocks | अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल करणारे 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मजबूत कमाई

Hot Stocks

Hot Stocks | भारतीय शेअर बाजार निर्देशांक शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 2.5 टक्क्यांनी घसरले. जागतिक नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. खरं तर वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात आणखी वाढ करु शकते, त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या पैसे काढून घ्यायला सुरुवात केली आहे. असे काही नकारात्मक संकेत मिळत असताना भारतीय शेअर बाजार विक्रीचा दबाव वाढत आहे, मात्र 5 कंपनीचे शेअर्स उलट्या दिशेने ट्रेड करत होते. या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे.

रॉयल इंडिया :
‘रॉयल इंडिया’ या स्मॉल कॅप कंपनीचे बाजार भांडवल 10.71 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 39.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स अवघ्या 5 दिवसात 3.32 रुपयांवरून वाढून 4.64 रुपयांवर पोहोचले आहेत. मागील शुक्रवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 4.64 रुपयांवर क्लोज झाला होता. तर सोमवार दिनाक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.87 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपये लावले त्यांना आता 1.40 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मात्र स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Nintech Systems :
Nintech Systems कंपनीच्या शेअरने देखील मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स काही दिवसात 261 रुपये वरून वाढून 362.55 रुपये किमतीवर पोहचले आहेत. अशा प्रकारे गुंतवणूकदारांनी अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्समधून 38.91 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 283.08 कोटी रुपये आहे. या स्टॉकने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 38.91 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 375.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कर्मा एनर्जी :
‘कर्मा एनर्जी’ कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात आपल्या शेअर धारकांना 33.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 दिवसात या कंपनीचे शेअर्स 22.65 रुपयांवरून वाढून 30.20 रुपयांवर पोहोचले होते. म्हणजेच अवघ्या पाच दिवसात गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 33.33 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 35 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 29.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रुद्र ग्लोबल इन्फ्रा :
‘रुद्र ग्लोबल इन्फ्रा’ कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 72.85 रुपयांवरून वाढून 94.65 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या पाच दिवसात या शेअर मधून गुंतवणूकदारांनी 29.92 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 237.44 कोटी रुपये आहे. तर सोमवार दिनाक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के घसरणीसह 93.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Le Levoire :
Le Levoir कंपनीच्या शेअरनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील पाच दिवसात हा स्टॉक 27.50 रुपयांवरून वाढून 37.85 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसात 27.82 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 11.39 कोटी रुपये आहे. सोमवार दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.68 टक्के वाढीसह 37.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks has given huge profit in 5 trading sessions check details on 27 February 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stocks(297)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x