22 November 2024 5:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tata Motors Share Price | जिधर टाटा, उधर नो घाटा! टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये शानदार तेजी, पाहा टार्गेट प्राईस

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा मोटर्स’ चे शेअर्स पुढील काळात 500 रुपयांपर्यंत वाढू शकतात. टाटा मोटर्स कंपनी आता तोट्यातून सावरत आहे. या कंपनीने डिसेंबर 2022 च्या तिमाहीत मजबूत नफा कमावला आहे. असे असूनही टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स मागील 5 दिवसांत 2.44 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ब्रोकरेज फर्म टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर लक्ष्य किंमत आणि स्टॉप लॉस चा अंदाज व्यक्त करत आहेत. चला तर मग जाणून घेत सविस्तर माहीती. (Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Motors Share Price | Tata Motors Stock Price | BSE 500570 | NSE TataMotors)

डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने 2,957.71 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. तर कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीत 1,516 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. सप्टेंबर 2022 तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीला 944.61 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या या ऑटो कंपनीला ‘तटस्थ’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 415 रुपये लक्ष किंमत दिली आहे. नोमुरा फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर 508 रुपये लक्ष किंमत देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा मोटर्स शेअरची कामगिरी :
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या शेअर धारकांना 8 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या स्टॉकने लोकांना नकारात्मक परतावा मिळवून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे लावले होते, त्यांना सध्या 5.72 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के वाढीसह 423.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 494.40 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 366.20 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Tata Motors Share Price 500570 TataMotors stock market live on 28 February 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x