23 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Indiabulls Real Estate Share Price | एका बातमीमुळे या शेअरमध्ये मोठ्या हालचाली, जाणून घ्या स्टॉक पडझडीचे कारण

Indiabulls Real Estate Share Price

Indiabulls Real Estate Share Price | ‘इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड’ या रिअल इस्टेट कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाशी संबंधित एक नकारात्मक बातमी आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी ‘मेहुल जॉन्सन’ यांनी आपल्या पदाचा त्याग केला असून राजीनामा सादर केला आहे. ‘मेहुल जॉन्सन’ यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई इंडेक्सवर इंट्रा-डे ट्रेडमध्ये इंडियाबुल्स रिअल इस्टेट कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली आणि स्टॉक 56.70 रुपयांवर आला. या कंपनीचे बाजार भांडवल 3,109.22 कोटी रुपये आहे. 14 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 50.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. बुधवारी (०१ मार्च २०२३) हा शेअर 5.05% वाढून 60.50 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Indiabulls Real Estate Share Price | Indiabulls Real Estate Stock Price | BSE 532832 | NSE IBREALEST)

राजीनाम्याचे कारण :
‘इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड’ कंपनीने माहिती दिली की, मेहुल जॉन्सन यांनी सोमवारी त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे व्यवस्थापकीय संचालक पदाचा त्याग केला असून राजीनामा सादर केला आहे. तथापि संचालक मंडळाच्या विनंतीनुसार मेहुल जॉन्सन 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीचे गैर-कार्यकारी, गैर-स्वतंत्र संचालक म्हणून काम करत राहतील. दरम्यान कंपनीच्या संचालक मंडळाने ‘सचिन चित्तरंजन शहा’ यांना नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याला मान्यता दिली आहे. ही नियुक्ती 5 वर्षांच्या कालावधी साठी करण्यात आली आहे.

इंडियाबुल्स रिअल इस्टेट लिमिटेड कंपनीला ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत 236.77 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. एक वर्षभरापूर्वी याच तिमाही कालावधीत कंपनीला 87.04 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तथापि सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 56.71 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 148.47 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे, जो मागील तिमाहीत 355.59 कोटी रुपये होता. याचा अर्थ कंपनीचा महसूल या तिमाही घटला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indiabulls Real Estate Share Price 532832 IBREALEST stock market live on 01 March 2023.

हॅशटॅग्स

Indiabulls Real Estate Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x