23 November 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

LPG Cylinder Price Hiked | सामान्य लोकांचं आर्थिक वाट्टोळं थांबेना, घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर प्रचंड वाढवले

LPG Cylinder Price Hiked

LPG Cylinder Price Hiked | महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक वाईट बातमी आणि आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी महाग झाली आहे. 6 जुलै 2022 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर होते. तर व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांनी वाढ झाली आहे.

घरगुती एलपीजीचे दर १ मार्चला
दिल्लीत आजपासून १०५३ रुपयांऐवजी १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर मिळणार आहे. मुंबईत हा सिलिंडर 1052.50 रुपयांऐवजी 1102.5 रुपयांना विकला जाणार आहे. कोलकात्यात आजपासून 1079 रुपयांऐवजी 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांऐवजी 1118.5 रुपयांना मिळणार आहे.

14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल
* 6 ऑक्टोबर 2021 पर्यंत 899.50 रुपये – 15 रुपयांची वाढ
* 22 मे 2022 पर्यंत 949.50 रुपये – 50 रुपयांची वाढ
* 7 मे 2022 999.50 रुपये – 50 रुपयांची वाढ
* 19 मे 2022 1003 रुपये – 3.50 रुपयांची वाढ
* 6 जुलै 2022 1053 रुपये – 50 रुपयांची वाढ
* 1 मार्च 2023 1103 रुपये – 50 रुपयांची वाढ

1 मार्च रोजी दिल्लीत कमर्शियल एलपीजी सिलिंडर 1769 रुपयांऐवजी 2119.5 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी कोलकात्यात ही किंमत 1870 रुपये होती, ती आता 2221.5 रुपये झाली आहे. मुंबईत त्याची किंमत १७२१ रुपयांवरून आता २०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. चेन्नईत १९१७ रुपयांना मिळणारा सिलिंडर आता २२६८ रुपयांना मिळणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LPG Cylinder Price Hiked check new price details on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#LPG Cylinder Price Hiked(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x