22 November 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Alok Industries Share Price | 14 रुपयाचा शेअर, मुकेश अंबानींच्या गुंतवणुकीनंतर तेजी, 5 दिवसात 17% परतावा, खरेदी करणार?

Alok Industries Share Price

Alok Industries Share Price | ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ या वस्त्रोद्योग क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज गुरूवार दिनाक 2 मार्च 2023 रोजी आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 14.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 16.80 टक्के वाढले आहेत. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.07 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 11 एप्रिल 2022 रोजी 29.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Alok Industries Share Price | Alok Industries Stock Price | BSE 521070 | NSE ALOKINDS)

अल्पावधीत भरघोस परतावा :
‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर्सने बीएसई निर्देशावर आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या एका आठवड्यात 27.27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 9 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तथापि गुंतवणूकदारांना तिमाही, सहामाही, एक वार्षिक, आणि दोन वर्षांच्या कालावधीत जबरदस्त नुकसान सहन करावा लागला आहे. मागील तीन वर्षाच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुतवणूकदारांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षात ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ गुंतवणूकदारांनी 348 टक्के परतावा कमावला आहे.

मुकेश अंबानींची गुंतवणूक :
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीचे 37.7 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. त्यासाठी अंबानींना 250 कोटी रुपये खर्च करावे लागले होते. रिलायन्स व्यतिरिक्त, जेएमएम फायनान्शियल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीने ही ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीच्या आर्थिक स्थितीचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की, डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीला जबर नुकसान सहन करावा लागला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीला 249.83 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर डिसेंबर 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत 0.09 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘आलोक इंडस्ट्रीज’ ही कापड व्यवसाय करणारी कंपनी आहे, जिच्या उत्पादन श्रेणीमध्ये कापूस आणि पॉलिस्टर या दोन्हींचा वापर केला जातो. ‘आलोक इंडस्ट्रीज’ कंपनीचे उत्पादन केंद्र गुजरात राज्यातील बाघी आणि केंद्रशासित प्रदेश सिल्वासा या ठिकाणी आहे. ‘आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचा ग्राहकवर्ग जगभरात पसरला आहे. कंपनीच्या ग्राहकांमध्ये जागतिक किरकोळ ब्रँड, परकीय आयातदार, खाजगी लेबल ब्रँड, देशांतर्गत किरकोळ व घाऊक व्यापारी, उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alok Industries Share Price 521070 ALOKINDS stock market live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

Alok Industries Share Price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x