22 November 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Pune Kasba Bypoll | कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी, इतिहास रचत महाविकास आघाडीने भाजप-शिंदे-फडणवीसांना धूळ चारली

Pune Kasba Bypoll Rabindra Dhangekar

Pune Kasba Bypoll | कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरूवात झाल. पुण्यात आजचा निवडणूक निकालाच आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

पोस्टल मतदानामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. मतमोजणीपासून धंगेकर यांनी आता 11 हजार 40 मतांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. वनी पेठे हा भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झाली. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाने कसबा पोटनिवडणुकीमध्ये सर्व ताकदपणाला लावली होती. मनसे, शिवसेना शिंदे गटाने सुद्धा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता.

त्यामुळे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची प्रतिक्षा अखेर संपली असून, भारतीय जनता पक्ष-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले आहेत. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने तगडी फाईट देत मोठा विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pune Kasba Bypoll Rabindra Dhangekar wins election check details on 02 March 2023.

हॅशटॅग्स

#Pune Kasba Bypoll Rabindra Dhangekar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x