22 November 2024 9:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Macfos Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या IPO शेअरने लिस्टिंग होताच एक दिवसात 80 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?

Macfos Share Price

Macfos Share Price | नुकताच ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना आता 80.39 टक्के परतावा मिळाला आहे. ‘मॅकफॉस लिमिटेड’ ही एक SME कंपनी असून BSE इंडेक्सवर कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची प्राइस बैंड 96 ते 102 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 रोजी ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 166.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)

शानदार लिस्टिंग मात्र स्टॉक फुस्स :
‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ला शानदार लिस्टिंग मिळाली. मात्र नंतर शेअर्समध्ये प्रॉफिट बुकींगाला सुरुवात झाली. त्यानंतर हा स्टॉक 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर अडकला. प्री लिस्टिग काळात हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार कामगिरी करत होता. बीएसई इंडेक्सवर कंपनीचे शेअर्स 90 टक्क्यांच्या वाढीसह 184 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते.

कंपनीच्या IPO शी संबंधित तपशील
1) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO 17 फेब्रुवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत.
3) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहेत.
4) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO लॉट मध्ये 1200 शेअर्स जारी केले होते.
5) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीच्या आयपीओचा आकार 23.74 कोटी रुपये होता.
6) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO स्टॉक BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाला आहे.
7) ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 90.12 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘मॅकफॉस लिमिटेड’ ही कंपनी पुणे येथे काम करते. कंपनी मुख्यतः रोबोटिक पार्टस, मोबाईल अप्लिकेशन्स, ई बाईक पार्ट्स, ट्रेंडी प्रिंटर अँड पार्ट्स इत्यादी उत्पादनांचे व्यापार करते. कंपनीच्या क्लायंटमध्ये विप्रो, टाटा पॉवर, आणि ओएनजीसी सारख्या दिग्गज कंपन्या सामील आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macfos Share Price stock market listing live on 02 March 2023.

हॅशटॅग्स

Macfos Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x