22 November 2024 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

NMDC Share Price | 47 पैशांवर ट्रेड करणारा शेअर, गुंतवणुकदार झाले करोडपती, स्टॉकचा तपशील जाणून घ्या

NMDC Share price

NMDC Share Price | एनएमडीसी या लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आज कमजोरीमध्ये क्लोज झाले आहेत. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के घसरणीसह 113.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 7 टक्क्यांनी घटली आहे. या कंपनीच्या स्टॉकने दीर्घ कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. एनएमडीसी कंपनीच्या स्टॉकने फक्त 41,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते स्टीलच्या वाढत्या मागणीमुळे एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 155 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 2 मार्च 2023 रोजी BSE इंडेक्सवर 0.57 टक्के घसरणीसह 113.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.  (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | NMDC Steel Share Price | NMDC Steel Stock Price | NSE NSLNISP)

एनएमडीसी शेअर बाबत तज्ञांचे मत :
एनएमडीसी कंपनी ही भारतातील लोहखनिज उत्खनन करणारी एकमेव सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त आहे. एनएमडीसी या कंपनीने 2022 मध्ये 42 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन केले होते. त्यापैकी 41 दशलक्ष टन लोह खनिज विकले होते. आर्थिक वर्ष 2024 पर्यंत एनएमडीसी कंपनीने 50 दशलक्ष टन उत्पादन करण्याचे आणि नंतर ते 70-75 दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने विश्वास व्यक्त केला आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एनएमडीसी कंपनीचा EBITDA मार्जिन 34.3 टक्केवर जाऊ शकतो. आणि ते 2023-24 या आर्थिक वर्षात EBITDA 35.5 टक्के वर जाऊ शकतो. या कारणांमुळे ब्रोकरेज फर्मने एनएमडीसी कंपनीच्या शेअरवर 140 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एनएमडीसी कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणुकीसाठी 155 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.

41,000 रुपयेवर करोडपती :
2 फेब्रुवारी 2001 रोजी NMDC कंपनीचे शेअर्स 47 पैशांवर ट्रेड करत होते. आता या कंपनीच्या शेअर्सची किंमत 244 पट वर गेली आहे. आज एनएमडीसी कंपनीचे शेअर्स 113.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्या लोकांनी 2001 साली एनएमडीसी कंपनीच्या शेअरमध्ये 41 हजार रुपये लावले होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत.

52 आठवडे उच्चांक आणि नीचांक किंमत :
एनएमडीसी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175.40 रुपये होती. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 93.60 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NMDC Steel Share Price NSLNISP stock market live on 03 March 2023.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x