16 April 2025 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

भाजपच्या जाहीरनाम्यात २०२४ मधील लोकसभेची गाजर पेरणी?

Narendra Modi, Amit Shah, BJP, Rajanath Singh, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : आमागी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नवी दिल्ली येथे आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव दिले आहे. यावेळी नवी दिल्लीतील भाजपाच्या कार्यालयात यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

भाजपाने सन २०२२ पर्यंत आपल्या संकल्प पत्रातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये शेती, संरक्षण, व्यापार यासह अनेक मुद्द्यावर विचार करुन ‘संकल्पपत्र’ तयार करण्यात आले आहे. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनाम्यासाठी समिती तयार करण्यात आली होती. यासाठी देशभरातून जवळपास ७५०० सूचना पेट्या, ३०० रथ आणि इलेक्ट्रानिक माध्यमांकडून सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.

दरम्यान, गेल्या २ एप्रिल रोजी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार केल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली होती. परंतु आजचा भाजपचा जाहीरनामा पाहिल्यास त्यांनी केवळ २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची गाजर पेरणी केल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

भाजपाच्या ‘संकल्पपत्रा’तील महत्वाचे मुद्दे …

१. 1 लाखापर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत कोणतेही व्याज नाही
२. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार.
३. राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
४. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी
५. छोट्या व्यापाऱ्यांना पेंशन मिळणार
६. प्रत्येक घरात वीज, शौचालय पोहोचवण्यातं लक्ष्य
७. सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळाणार
८. तिहेरी तलाक विरोधात कठोर कायदा आणणार
९. सिटीजनशिप विधेयक लागू करणार
१०. सर्व शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा फायदा मिळणार
११. समान नागरी कायदा लागू करणार.
१२. देशातील छोट्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करणार
१३. सन २०२२ पर्यंत देशभरातील सर्वच रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करणार
१४. कलम ३५ अ रद्द करण्यासाठी सरकार कटिबद्ध
१५. ५ किमी अंतरात बँकिंग सुविधा करणार
१६. सरकारी प्रक्रिया, कामकाज संपूर्ण डिजिटल करण्यावर जोर
१७. कलम ३५-अ हटवण्यासाठी प्रयत्न करणार
१८. ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करणार
१९. कुपोषणाचा स्तर घटवणार
२०. आरोग्य सेवा घराच्या दाराशी पोहोचावी अशी व्यवस्था करणार
२१. सर्व घरांत शौचालय असेल यावर काम करणार
२२. सर्वांना घर मिळावे यासाठी संकल्पबद्ध
२३. सर्वांना घरगुती गॅस उपलब्ध करून देणार
२४. राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करणार
२५. नल सें जल यावर काम करणार
२६. दुष्काळ, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलशक्ती मंत्रालय बनवणार

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या