6 January 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Sadhna Broadcast Share Price | या कंपनीच्या शेअरमध्ये बॉलिवूडच्या सर्किटकडून गडबड, सेबी केली अशी कारवाई

Sadhna Broadcast Share Price

Sadhna Broadcast Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीचे शेअर्स कमालीचे कोसळले आहेत. या कंपनीच्या स्टॉकमध्ये 5 टक्के लोअर सर्किट लागला होता. वस्तुतः शेअर बाजार नियमन करणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीच्या स्टॉकमध्ये फेरफार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह अनेक लोकांना दोषी ठरवले आहे. यामध्ये अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेटी, आणि साधना ब्रॉडकास्ट कंपनीच्या प्रवर्तकांसह 31 कंपन्यांवर शेअर बाजारात बंदी घालण्यात आली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sadhna Broadcast Share Price | Sadhna Broadcast Stock Price | BSE 540821)

टीव्ही चॅनल कंपनी ‘साधना ब्रॉडकास्ट’ च्या शेअरच्या किमतीत हेराफेरी होत असल्याच्या अनेक तक्रारी सेबीकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाढवण्यासाठी फेक व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करून गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात होती. यानंतर शेअर्समधून फायदा कमावून आरोपी निघून जात होते. आरोपानंतर SEBI ने एप्रिल-सप्टेंबर 2022 दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. आणि एप्रिल ते जुलै 2022 या कालावधीत साधना ब्रोडकास्ट कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यात आणि व्हॉल्यूममध्ये जबरदस्त वाढ होत असल्याचे सेबीच्या चौकशीत सामोरे आले. जुलै 2022 च्या दुसऱ्या पंधरवड्यात ‘द अॅडव्हायझर’ आणि ‘मनीवाइज’ या दोन YouTube चॅनेलवर साधना ब्रोडकास्ट कंपनीच्या शेअर विषयी खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ अपलोड केले जात होते. या व्हिडिओंनंतर साधना ब्रोडकास्ट कंपनीच्या शेअरच्या किमतीत आणि व्हॉल्यूममध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. मात्र अर्शद वारसीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले असून, आपल्याला शेअर बाजाराचे कोणतेही ज्ञान नाही असे त्याने म्हंटले आहे.

या यूट्यूब चॅनल कडून गौतम अदानीच्या नावाने फसवणूक केली गेली आहे. सेबीच्या मते बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीसह अनेकांनी फुगलेल्या किमतीत साधना ब्रोडकास्ट कंपनीचे शेअर्स विकून नफा कमावला आहे. साधना ब्रॉडकास्ट कंपनी अदानी उद्योग समूहाकडून खरेदी केली जाणार आहे, असा खोटा दावा आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टी या व्हिडिओमधून सांगण्यात आल्या आहेत.

हे सर्व प्रकरण सामोरे येताच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी कोसळले. काल या कंपनीचे शेअर्स 5.26 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका वर्षात ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 196.61 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 414.71 टक्के परतावा कमावून दिला आहे. याशिवाय मागील तीन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकची किंमत 639.44 टक्के वाढली आहे. 16 ऑगस्ट 2022 रोजी ‘साधना ब्रॉडकास्ट’ कंपनीचे शेअर्स 34.80 रुपये या सर्वकालीन उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sadhna Broadcast Share Price 540821 stock market live on 04 March 2023.

हॅशटॅग्स

Sadhna Broadcast Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x