22 April 2025 11:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | एक दिवसात 12 टक्क्यांनी वाढला पेनी स्टॉक, स्टॉक खरेदीला गर्दी, फायदा घ्या - NSE: RTNPOWER Tata Technologies Share Price | का तुटून पडत आहेत गुंतवणूकदार टाटा टेक शेअर्सवर? संधी सोडू नका - NSE: TATATECH Trident Share Price | पेनी स्टॉकने अप्पर सर्किट हिट केला, यापूर्वी 5676% रिटर्न दिला, श्रीमंत करू शकतो हा स्टॉक - NSE: TRIDENT 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Divgi Torqtransfer Systems IPO | हा IPO मालामाल करणार, ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, लिस्टिंगमध्ये मजबूत फायदा?

Divgi Torqtransfer Systems IPO

Divgi Torqtransfer Systems IPO| ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ या ऑटो कंपोनंट निर्माता कंपनीच्या IPO ची मुदत संपली आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त नफ्याचे संकेत देत आहे. हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

स्टॉक GMP सविस्तर :
‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची इश्यू किंमत 560 ते 590 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. याचा अर्थ कंपनीचे शेअर्स 660 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात.

गुंतवणूकदारांचा प्रतिसाद :
‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचा IPO 5.44 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. शुक्रवारी बिडिंगच्या शेवटच्या दिवशी NSE वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, या IPO ला 38,41,800 शेअर्सवर 2,08,87,225 शेअरची बोली प्राप्त झाली. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 4.31 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.40 पट आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 7.83 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

IPO तपशील :
‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीच्या IPO अंतर्गत 180 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात जारी करण्यात आले आहेत. याशिवाय 39,34,243 शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करण्यात आले आहेत. कंपनी IPO इश्यू किमतीच्या अप्पर बँडवर 412 कोटी रुपयांपेक्षा थोडे अधिक फंड जमा करेल अशी अपेक्षा आहे. ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम्स’ कंपनीचे शेअर्स 14 मार्च 2023 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर सूचीबद्ध होतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Divgi Torqtransfer Systems IPO listing date check details on 06 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Divgi Torqtransfer Systems IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या