6 January 2025 5:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Finolex Industries Share Price | जबरदस्त शेअर! 59,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर करोडमध्ये परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला, कारण?

Finolex Industries Share Price

Finolex Industries Share Price | कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ‘पीव्हीसी पाईप्स’ ची निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या ‘फिनोलेक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स या वर्षी 10 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. तथापि दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकमध्ये मजबूत तेजीचा अंदाज व्यक्त करत आहेत. अनेक ब्रोकरेज फर्म फिनोलेक्स कंपनीच्या शेअरवर 196 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे, जी सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 15 टक्के जास्त आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी फिनोलेक्स कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 170.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Finolex Industries Share Price | Finolex Industries Stock Price | BSE 500940 | NSE FINPIPE)

मागील काही काळापासून पीव्हीसीच्या किमती घसरल्या होत्या, मात्र आता PVC ची किंमत पुन्हा वाढत आहेत, त्यामुळे डीलर्स पुन्हा स्टॉक खरेदी करत आहेत. डिसेंबर 2022 च्या तिमाहीनंतर जानेवारी- मार्च 2023 मध्ये देखील कृषी पाईप्सच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, लागवडीचा हंगाम सुरू होणार आहे, त्यामुळे मार्च 2023 मध्ये PVC पाइपची मागणी वाढू शकते. गृहनिर्माण बाजारातील तेजीमुळे पाइपची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. या सर्व गोष्टींमुळे ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने फिनोलेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर ‘अॅड टू बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 196 रुपये लक्ष्य किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

25 सप्टेंबर 1998 रोजी फिनोलेक्स कंपनीचे 99 पैशांवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 170.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 25 वर्षांपूर्वी केवळ 59,000 रुपये लावणारे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. फिनोलेक्स कंपनीने केवळ दीर्घ मुदतीतच नाही तर अल्प कालावधीतही लोकांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. मागील वर्षी 12 मे 2022 रोजी फिनोलेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 128 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यानंतर पुढील सात महिन्यांत म्हणजेच 29 डिसेंबर 2022 स्टॉक 52 टक्क्यांनी वाढून 194.95 रुपयांवर पोहोचला. मात्र शेअर्समधील तेजी इथेच थांबली आणि आतापर्यंत स्टॉक 13 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. शेअरमध्ये आणखी चढ उतार होऊ शकतात असे तज्ज्ञांना वाटते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Finolex Industries Share Price 500940 FINPIPE stock market live on 06 March 2023.

हॅशटॅग्स

Finolex Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x