23 November 2024 5:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

सीबीआयने आमच्या घरात कार्यालय उघडावे, ये-जा करण्याचा पैसा बचत होईल, तेजस्वी यांनी CBI आणि भाजपाची उडवली खिल्ली

DCM Tejashwi Yadav

Bihar DCM Tejasvi Yadav | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी झालेल्या चौकशीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि CBI तसेच मोदी सरकारची देखील खिल्ली उडवली आहे. याआधीही आम्ही सीबीआयला सांगितलं होतं की, तुम्ही दर महिन्याला इथे येण्याची तसदी का घेता. आपले कार्यालय आमच्या घरीच उघडा. तुम्हा लोकांना पुन्हा पुन्हा येथे यावे लागते, त्यासाठी जनतेचा पैसा खर्च होतो. दरम्यान, जमिनीच्या मोबदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयचे पथक बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. राबडी देवी यांची सीबीआयने तब्बल चार तास चौकशी केली.

सोमवारी विधान परिषदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना तेजस्वी म्हणाले की, भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विविध यंत्रणांच्या माध्यमातून त्रास दिला जातो. मात्र, कोणी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर तो हरिश्चंद्र बनतो. जनता हे सर्व पाहत आहेत. तेजस्वी पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुरू राहील. पण चूक झालीच नाही, तर त्याची काळजी कशाला? असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही सीबीआयला सुरुवातीपासूनच तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. एखादी व्यक्ती मग ते केंद्रीय मंत्री असो, पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, ते कोणालाही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पाळावी लागते. मंत्र्याच्या स्वाक्षरीवर कोणालाही नोकरी मिळत नाही. यात काय घोटाळा आहे? रेल्वे मंत्रालयानेही हा घोटाळा मानला नाही असं देखील तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे, लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनीही राबडी यांच्या निवासस्थानी सीबीआयच्या कारवाईवरून भाजपवर हल्ला बोल केला आहे. रोहिणी यांनी ट्विट केले की, ज्या व्यक्तीची अदानींशी मैत्री आहे, तिकडे सीबीआय-ईडीला घर जावई बनवून ठेवले आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, छाप्यांच्या बदल्यात सत्ता मिळवण्याचा त्यांचा हेतू धुळीत मिळवायचा आहे. चोरांच्या टोळीला धडा शिकवावा लागेल असं हल्लाबोल लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: DCM Tejashwi Yadav said CBI should open office in my house so money will be saved o6 March 2023.

हॅशटॅग्स

#DCM Tejashwi Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x