भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे मोठ्या राजकीय बंडाच्या तयारीत, थेट मोदी-शहांना आव्हान देणार?
Rajasthan Assembly Election 2023 | राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शक्तिप्रदर्शन करून मोदी-शहांना आपल्या ताकदीची जाणीव करून दिली आहे. वसुंधरा राजे यांच्या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपमधील त्यांचा कट्टर विरोधक गट सुद्धा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या राजकारणात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया हे कट्टर विरोधक मानले जातात. किरोरी लाल मीना यांच्याशी संबंध बिघडत आहेत. यामुळेच भाजप पक्षनेतृत्व मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर न करण्याच्या भूमिकेत असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता अधिक वाढत आहे.
एकीकडे वसुंधरा राजे यांना बगल देत, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या नावाखाली स्थानिक पक्षाचे नेते पंतप्रधान मोदी आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह कमळ यांच्या नावाने निवडणूक लढवण्याची चर्चा करत आहेत. तरीही वसुंधरा राजे यांनी ताकद दाखवून आपली मोदी शहांना घाम फोडला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पण भाजपचा रस्ता सोपा नाही. दुसरीकडे, मोदी-शहांना जुन्या चेहऱ्यांच्या आधारे चालवायचे नाही आणि राज्यस्थान त्यांना स्वतःच्या मुठीत ठेवायचं आहे. देशातील इतर अनेक राज्यांमध्ये स्थानिक चेहरामोहरा बदलून मोदींनी त्यांच्या हो ला हो म्हणणारे नेते महत्वाच्या खुर्चीवर बसवले आहेत. तेच मोदी-शहा यांना राजस्थानमध्ये करायचं आहे.
नड्डा यांच्या बैठकीत खुर्च्या रिकाम्या
विशेष म्हणजे जेव्हा अमित शहा जाधेपूरमध्ये सभा घेण्यासाठी आले होते. यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत रामदेवरा यात्रा काढणार होते. केंद्रीय संघटनेच्या सांगण्यावरून ही यात्रा पुढे ढकलण्यात आली. यानंतर पूनिया यांनी एकट्याने पायी प्रवास करत पक्षाला वेगळा संदेश दिला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले – एकला चालो. राजस्थानच्या राजकारणात पूनिया हे वसुंधरा राजे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. नड्डा यांनी जयपूरयेथून जनआक्रोश यात्रेच्या रथांना हिरवा झेंडा दाखवला होता. भाजपमधील फूट आणि नेत्यांमधील कलहाचा परिणाम असा झाला की नड्डा यांच्या आगमनाच्या काही मिनिटे आधी मंडपाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. नेत्यांनी गर्दी जमवण्याचा कोणताही प्रयत्न केलेला दिसत नव्हता. त्यामुळे केंद्रीय नैतृत्वाला वसुंधरा राजे यांच्या राजकीय ताकदीची चुणूक पाहायला मिळाली होती.
वसुंधरा राजे आणि पूनिया एकमेकांना जाहीर इशारे देतं आहेत
राजस्थान भाजपमधील गटबाजी इतकी टोकाला गेली आहे की, केंद्रीय मंत्री शेखावत, पुनिया आणि वसुंधरा राजे अनेकदा एकाच व्यासपीठावर एकमेकांना इशाऱ्याने लक्ष्य करत आहेत. 2019 सालानंतर एकच प्रसंग आला जेव्हा हे चारही नेते एका व्यासपीठावर एकत्र बसले होते. मात्र, त्यांच्या एकत्र बसण्याचे कारण पंतप्रधान मोदी होते. १२ फेब्रुवारीच्या सभेपूर्वीच किरोड़ी मीणा यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर पणे प्रश्नचिन्ह उपस्थित करत संपूर्ण भाजप संघटनेला कोंडीत उभे केले होते. पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित करण्यात सतीश पूनिया अपयशी ठरल्याचे किरोड़ी लाल यांचे म्हणणे आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Rajasthan Vasundhara Raje challenges PM Modi and Amit Shah before assembly election 2023 check details on 07 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार