23 November 2024 1:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Rhetan TMT Share Price | क्या बात! 6 महिन्यात 777% परतावा, प्लस फ्री बोनस शेअर्स, स्टॉक डिटेल्स पहा

Rhetan TMT Share Price

Rhetan TMT Share Price | मागील काही महिन्यांपासून गुंतवणुकदारांना बंपर परतावा देणाऱ्या ‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 11:4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे. याशिवाय ऱ्हेतन टीएमटी कंपनीने स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनीने या बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख जाहीर केली असून या तारखे पर्यंत शेअर धारण करणाऱ्या लोकांना बोनस आणि स्टॉक स्प्लिट चा लाभ मिळेल. मागील 6 महिन्यांत ऱ्हेतन टीएमटी कंपनीने आपल्या शेअर धारकांना 750 टक्के परतावा कमावून दिला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rhetan TMT Share Price | Rhetan TMT Stock Price | BSE 543590)

रेकॉर्ड तारीख :
‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीने संचालक मंडळाची मान्यता घेतली आहे. कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 4 शेअरवर 11 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. याशिवाय कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. कंपनीने या बोनस इश्यू आणि स्टॉक स्प्लिटसाठी 10 मार्च 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीचे शेअर्स 0.38 टक्क्यांच्या वाढीसह 511.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीने सप्टेंबर 2022 पासून आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 522.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत ‘ऱ्हेतन टीएमटी’ कंपनीच्या शेअरची किंमत 751.04 टक्क्यांनी वर गेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rhetan TMT Share Price 543590 stock market live on 08 March 2023.

हॅशटॅग्स

#Rhetan TMT Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x