26 November 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News
x

SBI Saving Account | एसबीआय बँक खातेधारकांना मिळणार 2 लाखांचा फायदा, अजून अनेक फायदे, काय आहे योजना?

SBI Saving Account

SBI Saving Account | देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना मोठा लाभ मोफत देत आहे. या योजनेअंतर्गत बँकेच्या ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत दिला जात आहे आणि त्यासोबत इतरही सुविधा देण्यात येणार आहेत. जनधन खाते असलेल्या खातेदारांना बँक ही सुविधा देत आहे. जनधन योजना 2014 मध्ये सुरु झाली होती. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वित्तीय सेवा, बँकिंग बचत आणि देखभाल, पतपुरवठा, विमा, पेन्शन प्रदान करते.

फ्री एसबीआय रुपे जनधन कार्ड
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) जनधन ग्राहकांना एसबीआय रुपे जनधन कार्ड सुविधा प्रदान करते. या कार्डवर बँक ग्राहकांना २ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे. तसेच रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदीही करू शकता.

टीमच्या SBI बेसिक अकाउंटला जनधन अकाउंटमध्ये ट्रांसफर करा
बचत खाते जनधन योजनेच्या खात्यात हस्तांतरित करण्याचा ही पर्याय आहे. जनधन खातेधारकांना बँकेकडून रुपे पीएमजेडीवाय कार्ड मिळते. या अंतर्गत 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडण्यात आलेल्या जनधन खात्यांवर जारी करण्यात आलेल्या रुपे पीएमजेडीवाय कार्डच्या विम्याची रक्कम 1 लाख रुपये असेल. २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी खाते उघडणाऱ्या ग्राहकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या रुपे कार्डवर दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण मिळणार आहे.

वैयक्तिक अपघातांचाही होणार समावेश
स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत भारताबाहेरील घटनांचाही वैयक्तिक अपघात पॉलिसीत समावेश करण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर विम्याच्या रकमेनुसार भारतीय रुपयात दावा केला जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारस खात्यात नामनिर्देशित केला जाऊ शकतो.

SBI जनधन खाते कसे उघडावे
जर तुम्हाला तुमचं नवीन SBI जनधन खातं उघडायचं असेल तर तुम्ही जवळच्या SBI बँकेत जाऊन हे सहज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाइल क्रमांक, बँक शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नॉमिनी, व्यवसाय/ नोकरी आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव कोड किंवा शहर कोड द्यावा लागेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: SBI Saving Account Jandhan Yojana Benefits check details on 08 March 2023.

हॅशटॅग्स

#SBI Saving Account(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x