12 December 2024 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Jubilant Foodworks Share Price | महागडा डोमिनोज पिझ्झा पेक्षा डोमिनोजचा शेअर स्वस्त, बँक FD च्या वार्षिक व्याजापेक्षा 7 पट परतावा देईल

Jubilant Foodworks Share Price

Jubilant Foodworks Share Price | भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये ‘डोमिनोज पिझ्झा फ्रेंचायझी’ चालवणारी कंपनी ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ आता फ्राइड चिकनच्या व्यवसायात आपले नशीब आजमावत आहे. ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ कंपनीने चेन्नई आणि बेंगळुरू येथे अमेरिकन फास्ट फूड रेस्टॉरंट कंपनी ‘Popeyes’ स्टोअर सुरू केले आहे. या रेस्टॉरंटमध्ये तळलेले चिकन आणि इतर नॉनव्हेज खाद्यपदार्थ सर्व्ह केले जातील. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Jubilant FoodWorks Share Price | Jubilant FoodWorks Stock Price | BSE 533155 | NSE JUBLFOOD)

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ कंपनीच्या निर्णयाचे कौतुक केले असून शेअरची नवीन लक्ष किंमत 630 रुपये निश्चित केली आहे. ही लक्ष किंमत ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ कंपनीच्या सध्याच्या किमतीपेक्षा 37.75 टक्के जास्त आहे. गुरूवार दिनांक 9 मार्च 2023 रोजी ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के वाढीसह 462.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये 9.51 टक्के घसरण झाली आहे.

ICICI सिक्युरिटीजने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की, “Popeye’s India स्टोअरमधील आकर्षक वातावरण, स्टोअरचे सुंदर रंग त्याला आधुनिक स्वरूप आणि ग्राहकांना उत्तम अनुभव देतील. या स्टोअरमध्ये सेल्फ ऑर्डरिंग कियोस्क आहेत. चांगली प्रकाश व्यवस्था आणि आसनांची संख्या देखील जास्त आहे. तसेच स्टोअरमध्ये खुले एअर सीटिंगचा पर्याय देखील उपलब्ध असेल. ही सर्व वैशिष्ट्ये रेस्टॉरंटला इतरांपेक्षा वेगळे बनवतात. तसेच खाद्यपदार्थ चव आणि त्याची गुणवत्ता देखील अद्वितीय असेल. भारतीय ग्राहकांना हे रेस्टॉरंट खूप आवडतील अशी अपेक्षा आहे”.

ब्रोकरेज फर्मचा अंदाज :
‘ज़ुबिलंट फूडवर्क्स’ कंपनी FY2024 च्या शेवटपर्यंत 100 नवीन स्टोअर्स उघडण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ‘केएफसी’ हा फ्राइड चिकन मार्केटमधील सर्वात मोठा ब्रँड आहे. पुढील काही दिवसांत Popeyes रेस्टॉरंट याला आव्हान देताना दिसतील. या दोन्ही ब्रँडमधील स्पर्धेमुळे फ्राईड चिकनच्या बाजारपेठेतही लक्षणीय वाढ पाहायला मिळू शकते. जुबिलंट कंपनीची मजबूत बॅकएंड पायाभूत सुविधा, इन हाऊस डिजिटल आणि डेटा, पुरवठा साखळी, आणि व्यवस्थापन संघ, popeyes ला भारतात अधिक वेगाने वाढण्यास मदत करू शकतात.

‘ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेड’ कंपनीकडे भारत, नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये ‘डोमिनोज पिझ्झा’ ची मास्टर फ्रँचायझी आहे. याशिवाय ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ ही कंपनी भारतात ‘डंकिन डोनट्स’ स्टोअर्स देखील चालवत आहे. ‘ज्युबिलंट फूडवर्क्स’ कंपनीने आता भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान या देशासाठी Popeyes स्टोअर्सची मास्टर फ्रँचायझी मिळवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jubilant FoodWorks Share Price 533155 JUBLFOOD stock market live on 09 March 2023.

हॅशटॅग्स

#Jubilant Foodworks Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x