23 November 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Sequent Scientific Share Price | काय शेअर आहे! अवघ्या 5 दिवसात 32.33 टक्के परतावा दिला, स्टॉक वाढीचे कारण काय?

Sequent Scientific Share Price

Sequentnt Scientific Share Price | ‘सिक्वेंट सायंटिफिक’ या फार्मा कंपनीच्या शेअर मध्ये मागील पाच दिवसापासून कमालीची तेही पाहायला मिळत आहे. ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीने ‘टिनेटा फार्मा’ कंपनीचे अधिग्रहण करणार नाही, अशी घोषणा करताच ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 12.96 टक्के वाढीसह 83.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांनी वाढले होते. मागील पाच दिवसात ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीचे शेअर्स 32.33 टक्के वाढले आहेत. काही वेळा कंपनीची डील रद्द होण्याचा फायदाही शेअर धारकांना मिळत असतो. याचेच हे एक उदाहरण आहे.

7 नोव्हेंबर 2022 रोजी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत ‘Tineta Pharma’ कंपनीचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीने ही योजना रद्द केली आहे. 8 मार्च 2023 रोजी सिक्वेंट सायंटिफिक कंपनीने सेबीला सांगितले की आम्ही Tineta फार्मा कंपनी अधिग्रहणाचा निर्णय मागे घेत आहोत.

कंपनीची कामगिरी :
एक वर्षापूर्वी ज्या लोकांनी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीमध्ये पैसे लावले होते, त्यांना सध्या 40 टक्क्यांहून अधिक नुकसान सहन करावा लागत आहे. मागील 6 महिन्यांत सिक्वेंट सायंटिफिक कंपनीच्या शेअर्समध्ये 27.91 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 10.64 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 156 रुपये होती. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी आणि जगातील 20 व्या क्रमांकाची सर्वात मोठ्या पशु आरोग्य सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे. ‘द कार्लाइल ग्रुप’ ही जागतिक गुंतवणूक कंपनी ‘सिक्वेंट सायंटिफिक’ कंपनीची मूळ प्रवर्तक आहे. कंपनीने आपले उत्पादन केंद्र यूरोप, भारत आणि तुर्कीमध्ये स्थापन केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sequent Scientific Share Price check details on 10 March 2023.

हॅशटॅग्स

Sequent Scientific Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x