22 November 2024 11:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

IFL Enterprises Share Price | लॉटरी शेअर! 1 वर्षात गुंतवणूकदारांना 951% परतावा, प्लस स्टॉक स्प्लिट आणि फ्री बोनस शेअर्स, डिटेल्स पाहा

IFL Enterprises Share Price

IFL Enterprises Share Price | असे काही स्टॉक आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत मल्टीबॅगर परतावा कमवून देतात. सध्या जर तुम्ही मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करू इच्छित असला तर तुम्ही, ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 951 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन करून बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट बाजारातील स्टॉकची तरलता वाढवण्यासाठी जाहीर केली आहे. रेकॉर्ड तारखेपर्यंत स्टॉक धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात नवीन शेअर्स जमा केले जातील. आणि शेअरची किंमत विभाजन प्रमाणानुसार समायोजित केली जाईल.

बोनस आणि स्टॉक स्प्लिट :
स्टॉक स्प्लिट अंतर्गत ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यामध्ये विभाजित करणार आहे. सोबत कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 4 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करणार आहे. पात्र शेअर धारकांना प्रत्येक चार शेअरवर एक इक्विटी शेअर मोफत दिला जाईल. कंपनीने आपल्या शेअरची तरलता वाढवण्यासाठी तसेच त्याच्या स्टॉकची किंमत कमी करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांना परवडणारे वाटावे म्हणून स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर जारी करण्याच्या निर्णय घेतला आहे. स्टॉक स्प्लिटनंतर ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीचे 10 रुपये दर्शनी मूल्याचे इक्विटी शेअर्स प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्यावर येतील. कंपनीने सेबी फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, शेअर धारकांची मान्यता पोस्टल मतपत्रिकेद्वारे मिळवली जाईल. कंपनी लवकरच बोनस आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट जाहीर करेल.

1 वर्षात दिला 951 टक्के परतावा :
‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 951 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 106 टक्क्यांनी वर गेले आहेत. तर दुसरीकडे मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,873 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी ‘आयएफएल एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 153.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFL Enterprises Share Price return on investment on 11 March 2023.

हॅशटॅग्स

IFL Enterprises Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x