13 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Signature Bank Closed | अमेरिकेतील बँकिंग संकटाने जगभर चिंता वाढली, SVB नंतर या बँकेसाठी वाईट बातमी

Signature Bank Closed

Signature Bank Closed | अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेपाठोपाठ आता न्यूयॉर्कच्या सिग्नेचर बँकेबाबत ही वाईट बातमी समोर आली आहे. रविवारी अमेरिकेच्या नियामकाने सिग्नेचर बँक बंद केली. अमेरिकेच्या बँकिंग इतिहासातील ही तिसरी सर्वात मोठी धक्कादायक आर्थिक दुर्घटना आहे. 3 दिवसांच्या आत 2 बँकांच्या दुरवस्थेवर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं वक्तव्य आलं आहे.

सिग्नेचर बँकेचा ताबा घेतला
फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सिग्नेचर बँकेचा ताबा घेतला आहे, असे न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंटच्या फायनान्शियल सर्व्हिसेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत बँकेकडे ११०.३६ अब्ज डॉलरची मालमत्ता आणि ८८.५९ अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दोन बँकांच्या अपयशाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. नियामकांनी साइनचर बँक बंद करण्याचा निर्णय घेतला असताना त्यांनी हे विधान केले आहे. सोमवारी बायडेन युईश बँकिंग व्यवस्थेवरील गंभीर होत असलेल्या संकटावर आपले मत मांडणार आहेत.

सिलिकॉन व्हॅली बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी गेल्या 24 तासात 2 मोठी बातमी आली आहे. पहिली बातमी अशी होती की सरकार संकटात या बँकेला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही. मात्र, बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. १३ मार्चपासून म्हणजेच आजपासून ठेवीदारांचे त्यांच्या पैशांवर पूर्ण नियंत्रण राहणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Signature Bank Closed Banking Crisis in America check details on 13 March 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x