24 November 2024 7:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर 14 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांनी पुढे नेमकं काय करावं? तज्ज्ञांचा सल्ला पहा

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपला आणि येस बँकेच्या शेअर्सला उतरती कळा लागली. येस बँक या खासगी बँकेचे शेअर्स सध्या सहा महिन्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहचले आहेत. येस बँकेचे शेअर्स गुरूवार दिनांक 16 मार्च 2023 रोजी 2.61 टक्के घसरणीसह 14.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 14 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किंमत पातळीवरून येस बँक स्टॉक 37 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 1.29 टक्के कमजोरीसह 15.35 रुपयांवर ट्रेड करत होते. (Yes Bank Limited)

स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव :
येस बँकेच्या शेअरचा 3 वर्षांचा लॉक इन कालावधी संपल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियासारखे दिग्गज कर्जदाते आपले शेअर्स विकून बाहेर पडू शकतात. यामुळे येस बँक स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री पाहायला मिळू शकते. एसबीआयच्या नेतृत्वाखालील आठ दिग्गज बँकानी येस बँकेत 10,000 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. मागील 3 वर्षांत येस बँकेने आपल्या शेअर धारकांना मोठा परतावा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्मचे मत :
एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “येस बँकेचे शेअर्स 14 रुपयांच्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलजवळ ट्रेड करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता हा स्टॉक आणखी खोलात जाऊ शकतो. मोतीलाल ओसवाल फर्मचे तज्ञ म्हणाले की, “सध्या येस बँक शेअर्स मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. सध्या तरी येस बँकेच्या शेअर मध्ये स्थिरता येण्याचे संकेत मिळत नाही. म्हणून तज्ञांनी स्टॉक खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.

शेअरची कामगिरी :
17 ऑगस्ट 2018 रोजी येस बँकेचे शेअर्स 393 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 14.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच येस बँकेचे शेअर्स मागील पाच वर्षांत 96 टक्के कमजोर झाला आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर 9.67 टक्के कमजोर झाला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत येस बँकेने 52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तथापि, YTD आधारावर येस बँकेच्या नफ्यात 80 टक्के घट झाली आहे. डिसेंबर 2021 मध्ये येस बँकेने 266 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तथापि येस बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न YTD आधारावर 1970.6 कोटी रुपयेवर पोहचले आहे. त्याच वेळी वित्तीय वर्ष 2020 च्या मार्च तिमाहीत येस बँकेने 106 कोटी रुपये नफा कमावला होता, जो डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये 9 पट वाढून 914 कोटी रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price 532648 return on investment check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x