Adani Group | मंत्र्यांच्या आरोपांना मी संसदेत उत्तर देईन, अदानी प्रकरणावर पंतप्रधान मोदी आतापर्यंत गप्प का? - राहुल गांधी
Adani Group | संसदेत मोदी सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणे हा खासदार म्हणून माझा अधिकार आहे, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि सभागृहात बोलण्याची संधी देण्याची मागणी केली जेणेकरून ते आपल्यावरील आरोपांना उत्तर देऊ शकतील. पण ते सभागृहात गेल्यानंतर काही मिनिटांतच कामकाज तहकूब करण्यात आले आणि ते बोलू शकले नाहीत. मला आशा आहे की मला उद्या बोलण्याची परवानगी दिली जाईल. पण ते मला संसदेत बोलू देतील हे खात्रीने सांगता येत नाही. कदाचित उद्या बोलू दिलं जाणार नाही. संसदेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब झाल्यानंतर काही वेळातच बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान मोदींनी अद्याप अदानींवर उत्तर दिलेले नाही
अदानी प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजवत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. संसदेतील आपल्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांबद्दल जे काही बोलले होते, ते कामकाजातून काढून टाकण्यात आले, जरी त्यात कोणतीही अपारसदीय चर्चा नव्हती, असे कॉंग्रेस खासदार म्हणाले. राहुल म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या तील संबंधांबद्दल, उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पंतप्रधानांनी अद्याप उत्तर दिलेले नाही. मुख्य मुद्दा हा आहे की, पंतप्रधान मोदी आणि अदानी यांचे काय संबंध आहेत? अदानीचा मुद्दा उपस्थित करताना मोदी सरकार घाबरले आहे. त्यामुळेच खऱ्या मुद्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व नाट्य रचले जात आहे.
सरकार के 4 मंत्रियों ने मेरे ऊपर सदन में आरोप लगाया है तो मेरा हक है कि मैं सदन में अपनी बात रखूं।
आज मेरे आने के बाद ही सदन को स्थगित कर दिया गया और मुझे लगता है कि ये मुझे कल भी सदन में बोलने नहीं देंगे।
ये पूरा मामला अडानी के मुद्दे से ध्यान भटकाने का है।
:@RahulGandhi जी pic.twitter.com/VcCIkMwXth
— Congress (@INCIndia) March 16, 2023
खासदारांनी केली मानवी साखळी, जेपीसीची मागणी
दरम्यान, विविध विरोधी पक्षांच्या खासदारांनीही सभागृहाबाहेर मानवी साखळी तयार करून अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी जेपीसी स्थापन करण्याची मागणी केली. या आंदोलनाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत काँग्रेसने लिहिले की, “आज संपूर्ण विरोधक एकवटले आहेत आणि अदानी मेगा घोटाळ्यात जेपीसीची मागणी करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खर्गे यांनी विरोधी पक्षाच्या खासदारांसह आज सभागृहाबाहेर मानवी साखळी तयार केली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Adani Group MP Rahul Gandhi attacked on BJP Says he has a right to respond in parliament check details on 16 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News