27 November 2024 3:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

HDFC Bank Account Alert | एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्वाचं! तुमचा पैसा सुरक्षित? RBI'ने ठोठावला दंड, कारण काय?

HDFC Bank Account Alert

HDFC Bank Account Alert | नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) काही तरतुदींची पूर्तता न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला (HDFC Bank) पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने म्हटले आहे की एनएचबीने 31 मार्च 2022 रोजी कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे वैधानिक तपासणी केली होती.

कारणे दाखवा नोटीस :
२०१९-२० मध्ये कंपनी काही ठेवीदारांच्या मॅच्युअर ठेवी त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकली नसल्याचे या पाहणीत समोर आले आहे. त्यानंतर कंपनीला दंड का आकारू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कंपनीच्या उत्तराचा विचार केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तरतुदींचे पालन न केल्याचा आरोप पुरेसा असून त्याला दंड ठोठावण्यात यावा, असा निष्कर्ष काढला.

HDFC Bank शेअरचे काय झाले?
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एचडीएफसीचा शेअरही वधारला आणि १.१४ टक्क्यांनी वधारून २५६१ रुपयांवर पोहोचला. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक लिमिटेड यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आहे. शुक्रवारी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलनेही या विलीनीकरणाला मंजुरी दिली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: HDFC Bank Account Alert after action by RBI check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

#HDFC Bank Account Alert(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x