22 November 2024 12:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Brightcom Group Share Price | गुंतवणुकदारांना करोडपती करणारा शेअर चिल्लर भावात मिळतोय, खरेदी करावा? तपशील जाणून घ्या

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | एकेकाळी गुंतवणुकदारांना करोडपती बनवणाऱ्या ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चिल्लर किमतीवर विकले जात आहेत. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये बऱ्याच काळापासून घसरण सुरू आहे. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के वाढीसह 17.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ब्राइटकॉम ग्रुप लि कंपनीचे शेअर्स 17.23 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते, आणि तिथून स्टॉक मध्ये किंचित खरेदी पाहायला मिळाली होती. 2023 या वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 40.31 टक्के कमजोर झाले आहेत. (Brightcom Group Ltd)

शेअरची कामगिरी :
मागील एका वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 84 टक्के कमजोर झाले आहेत. या दरम्यान शेअरची किंमत 108 रुपयांवरून घसरणून सध्याच्या किमतीवर आली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एक वर्षापासून सातत्याने पडझड पाहायला मिळत आहे. नुकतेच ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीने शेअर्सच्या प्रचंड घसरणीबाबत आपल्या गुंतवणूकदारांना पत्र लिहून माहिती दिली होती. कंपनीच्या भवितव्याबाबतही अनेक चिंता व्यक्त केल्या जात आहेत , असे या पत्रात म्हटले आहे . कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे आणि आम्हाला चांगल्या भविष्याची अपेक्षा आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर 25 ठिकाणी काम करत आहे. 2021 या वर्षाच्या सुरुवातीला ‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,500 टक्के इतका मोठा परतावा कमावून दिला होता.

स्टॉक घसरणीचे कारण :
‘ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण तेव्हा सुरू झाली, जेव्हा शेअर बाजार नियामक सेबीने कंपनीच्या आर्थिक व्यवहार आणि कामगिरीबद्दल चिंता व्यक्त केली होती. आणि या कंपनीत गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी हानिकारक ठरू शकतात असे काही खुलासे कंपनीने जाहीर केले होते. अशी नकारात्मक बातमी पसरताच या कंपनीचे शेअर्स पडायला सुरुवात झाली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price 532368 return on investment check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x