25 November 2024 2:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News NTPC Share Price | एनटीपीसी शेअरसाठी 'आउटपरफॉर्म' रेटिंग, रॉकेट होणार शेअर, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
x

Wipro Share Price | हमखास श्रीमंत करणारा विप्रो शेअर अत्यंत स्वस्त झालाय, गुंतवणूकीची योग्य संधी सोडून देणार? तपशील पहा

Wipro Share Price

Wipro Share Price | मागील बऱ्याच काळापासून दिग्गज IT कंपनी ‘विप्रो’ चे शेअर्स चढ उताराच्या गर्तेत अडकले आहेत. शुक्रवार दिनांक 17 मार्च 2023 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के वाढीसह 376.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 महिन्यात विप्रो कंपनीचे शेअर्स 7.42 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. त्याच वेळी मागील एका वर्षात ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 37.19 टक्के घसरले आहेत. या कालावधीत S&P BSE सेन्सेक्स 1.4 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 21 मार्च 2022 रोजी ‘विप्रो’ कंपनीचे शेअर्स 616 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Wipro Share Limited)

स्टॉकमधील घसरणीचे कारण :
‘विप्रो’ कंपनीच्या शेअर्समध्ये इतकी मोठी घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, महसूल वाढीशी संबंधित चिंता आहे..निर्मल बंग इक्विटीज फर्मच्या तज्ञांना वाटते की, एप्रिल ते जून तिमाहीत ‘विप्रो’ कंपनीची वाढ खूप आव्हानात्मक असेल. कंपनीने घोषणा केली आहे की पुढील काळात कंपनी मॅक्रो आर्थिक अनिश्चितता आणि बदलत्या ग्राहकांच्या गरजा, यांमध्ये चार व्यापक श्रेणींमध्ये त्याचे व्यवस्थापन आणि व्यवसाय युनिट्स फेरबदल करेल. या नवीन मॉडेल अंतर्गत विप्रो कंपनीच्या व्यवसायात चार व्यापक श्रेणी निर्माण होतील, ज्याचे नामकरण कंपनीने ‘ग्लोबल बिझनेस लाइन्स’ असे केले आहे.

‘विप्रो’ स्टॉकची कामगिरी :
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत विप्रो कंपनीने 2.8 टक्क्यांच्या वाढीसह 3,052.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 2,969 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कालावधीत कंपनीच्या महसूलात 14.35 टक्क्यांची वाढीसह कंपनीने 23.229 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 20,313.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. विप्रो कंपनीच्या शेअर्स काही खास नव्हती. मागील एका महिन्यात स्टॉक 7.42 टक्के घसरला आहे. तर मागील एका वर्षभरात हा स्टॉक 37.19 टक्के घसरला आहे. त्याच वेळी मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 68 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Share Price 507685 return on investment check details on 18 March 2023.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x