22 November 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

हवेची दिशा? प्रत्येक बातमीवर मोदींवर समाज माध्यमातून नकारात्मक हल्लाबोल

Facebook, Narendra Modi, BJP

सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी देशभर सभांचा धडाका लावला आहे. त्यात सभांमधून येणाऱ्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून देखील अनेक बातम्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. देशभर निरनिराळ्या सर्व्हेमध्ये जरी भाजपाला पोषक वातावरण दाखवण्यात आलं असलं तरी समाज माध्यमांवर उमटणाऱ्या प्रतिक्रियांमधून वेगळेच निष्कर्ष समोर येताना दिसत आहेत. त्यासाठी आम्ही हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या तसेच वर्तमानपत्रांमधील समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचा आणि त्यावर येणाऱ्या संपूर्ण प्रतिक्रियांचा आढावा आपण घेतला आहे.

हिंदी, इंग्रजी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या तसेच वर्तमानपत्रांमधील सर्वच विषयांसंबंधित बातम्यांवर उमटणाऱ्या प्रतिक्रिया या भाजप आणि मोदी विरोधी असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यात भाजपने लष्कराने केलेल्या शौर्याच्या नावाने स्वतःच्या पक्षासाठी मतांचा जोगवा थेट जाहीर सभांमधून मागण्यास सुरुवात केल्याने, भाजप आणि मोदी विरोधी नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

त्यात भाजपचे पूर्वीचे व्हिडिओ आणि सध्याच्या घोषणा मोठ्याप्रमाणावर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर पुन्हा पसरवल्या जाऊ लागल्याने भाजपच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. त्यात दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राफेल करारा संबंधित पुनर्विचार याचिका पुराव्यासहित स्वीकारल्याने भाजपवर पुन्हा समाज माध्यमं तुटून पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे समाज माध्यमांवरील भाजप आणि मोदी विरोधी प्रतिक्रियांमधून तरुणांच्या मतांची दिशा देखील वेगळेच निष्कर्ष समोर आणत आहे. त्यामुळे हा नक्कीच भाजपसाठी चिंतेचा विषय आहे असं म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x