24 November 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

Kama Holdings Share Price | या शेअरवर 840 टक्के डिव्हीडंड मिळणार, फायदा घेण्यासाठी रेकॉर्ड डेट माहिती आहे का?

Kama Holdings Share Price

Kama Holdings Share Price| भारतीय शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना वेळोवेळी डिव्हिडंड देत असतात. अशा स्टॉकवर पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ ही कंपनी या आठवड्यात एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहे. ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 84 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के वाढीसह 11,985.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kama Holdings Limited)

लाभांश रेकॉर्ड डेट :
सेबीला दिलेल्या माहितीत ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ कंपनीने म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने एका शेअरवर 840 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर 84 रुपये लाभांश देणार आहे. यासाठी कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड तारीख म्हणून 21 मार्च 2023 हा दिवस निश्चित केला आहे. रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये सामील राहील, त्यांना कंपनी 1 शेअरवर 84 रुपये लाभांश देईल.

शेअरची कामगिरी :
मागील एका महिनाभरात ‘कामा होल्डिंग्ज लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये 2.18 टक्के घसरण झाली आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांना आता 7.27 टक्के नुकसान सहन करावे लागत आहे. कामा होल्डिंग्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 14,600 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 9165 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kama Holdings Share Price 532468 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

Kama Holdings Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x