22 November 2024 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Sunflag Iron Share Price | या शेअरमध्ये तुफान उसळी, हा शेअर बक्कळ कमाई करून देईल, स्टॉक डिटेल्स सविस्तर वाचा

Sunflag Iron Share Price

Sunflag Iron Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सनफ्लॅग आयर्न अॅड स्टील’ कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 162.55 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 152.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीच्या शेअर्सनी मागील पाच दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 6.99 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 9.92 टक्के वाढला आहे. (Sunflag Iron & Steel Company Limited)

स्टॉकमध्ये तुफानी वाढ :
अवघ्या दोन दिवसात ‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढले आहेत. तर शेअर्स ट्रेडिंगचे प्रमाण एका दिवसात 7 पटीने वाढले आहे. लॉयड्स मेटल लिमिटेड कंपनीचे 10 टक्के भाग भांडवल खरेदी केल्याने सनफ्लॅग आयर्न कंपनीच्या शेअरमध्ये ही तुफानी तेजीत पाहायला मिळाली आहे. सनफ्लॅग आयर्न कंपनीने लॉयड्स मेटल कंपनीमधील भाग भांडवल ऑप्शनल फुल्ली कन्व्हर्टेबल डिबेंचरचे रुपांतरण केल्यानंतर अधिग्रहण केले आहे.

शेअरची कामगिरी :
‘सनफ्लॅग आयर्न अँड स्टील’ कंपनीचे शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना कालावधीत 118.98 टक्के परतावा कमावून दिला आहे. 31 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 63.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज 21 मार्च 2023 रोजी सनफ्लॅग आयर्न कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 152.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 70.36 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 62.10 रुपये होती. तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने एकूण 869.42 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा निव्वळ नफा 59.15 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sunflag Iron Share Price 500404 on 21 March 2023.

हॅशटॅग्स

Sunflag Iron Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x