Tips Films Share Price | मनी मेकर स्टॉक! झटपट पैसा वाढवणाऱ्या शेअरची कामगिरी पाहा, शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय
Tips Films Share Price | शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनी असलेल्या ‘टिप्स फिल्म्स’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. काल हा स्टॉक बीएसई निर्देशांकावर 439.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी टिप्स फिल्म्स कंपनीचे शेअर्स 12.18 टक्के वाढीसह 495.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 35.00 टक्के वाढले आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये झालेली ही अचानक चालू आर्थिक वर्षाच्या तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पाहायला मिळाली आहे. (Tips Films Limited)
कंपनीचे तिमाही निकाल :
सेबीला दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2022 च्या तिमाहीत टिप्स फिल्म कंपनीचे एकूण परिचालन उत्पन्न 1,285.72 लाख रुपये होते. यापूर्वी सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 1,541.02 लाख रुपयेवर पोहचले होते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 9 महिन्यांत कंपनीने एकूण 3,945.07 लाख रुपये कमाई केली होती. त्याच वेळी सप्टेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत कंपनीची उलाढाल कमी झाली आहे. कंपनीचा नफा डिसेंबर 2022 तिमाहीत 1,024.71 लाख रुपयांवर आला होता, जो सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत 1,134.95 लाख रुपये नोंदवला गेला होता. सप्टेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या करानंतरचा निव्वळ नफा 804.95 लाखांवरून कमी होऊन 724.71 लाख रुपयेवर आला आहे.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी :
YTD आधारे टिप्स फिल्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 15.84 टक्के वाढले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 23.29 टक्के नफा मिळवून दिला आहे. टिप्स फिल्म्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 296.90 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 682 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 189.95 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tips Films Share Price NSE TIPSFILMS on 22 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC