23 November 2024 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Price Today | गुड न्यूज! आज सोन्याचे भाव धडाम झाले, खरेदीपूर्वी पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याने त्याचा परिणाम बुधवारी देशातील सराफा बाजारातही दिसून आला. आज सोन्याचा भाव 480 रुपयांनी घसरून 58,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, तर चांदीही 345 रुपयांनी घसरून 68,850 रुपये प्रति किलो झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली. मागच्या सत्रात सोन्याचे भाव 59,250 रुपये प्रति 10 ग्राम वर बंद झालं होते. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी सांगितले की, सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 480 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरून 58,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. (Gold Price Today Mumbai)

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याचा दर ५५ हजार रुपयांच्या जवळ आला होता. त्याचप्रमाणे 71,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचलेली चांदीही 61,000 रुपयांवर आली. गेल्या काही दिवसांपासून तेजी दिसल्यानंतर आता मंदीचे वातावरण आहे. जगभरातील बाजारातील मंदीच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदी दोन्ही अडचणीत सापडले आहेत. दिवाळीत चांदीचा भाव प्रतिकिलो ८० हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

एमसीएक्सवर दिसून आला संमिश्र ट्रेंड
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोने आणि चांदीमध्ये संमिश्र तेजी दिसून आली. बुधवारी सकाळी सोन्याचा भाव 34 रुपयांच्या घसरणीसह 58579 रुपयांवर व्यवहार करताना दिसला. तर चांदीचा भाव 188 रुपयांनी वाढून 68582 रुपये प्रति किलोग्राम झाला होता. याआधी मंगळवारी सोने 58579 रुपये आणि चांदी 68394 रुपयांवर बंद झाली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates today as on 22 March 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x