25 November 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337 Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News SIP Vs Post Office | SIP की पोस्ट ऑफिस RD, कोणती गुंतवणूक तुम्हाला बनवेल लखपती, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News Business Idea | कमाईचे साधन शोधत आहात; मग या 3 बिझनेस टिप्स खास तुमच्यासाठी, जोमाने होईल 12 महिने कमाई - Marathi News
x

Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला

Indigo Paints Share Price

Indigo Paints Share Price | सध्या शेअर बाजारातील अस्थिरता आणि चढ उतारांच्या काळात जर तुम्ही झटपट नफा कमवू इच्छित असाल तर तुम्ही ‘इंडिगो पेंट’ कंपनीच्या शेअरवर बाजी लावू शकता. पुढील काळात ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीचे शेअर्स किमान 50 टक्क्यांनी वाढून 1563 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. आज गुरूवार दिनाक 23 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.28 टक्के घसरणीसह 1,041.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (Indigo Paints Limited)

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने ‘इंडिगो पेंट्स’कंपनीच्या स्टॉकवर 1,410 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. शेअर बाजारातील 11 तज्ञांनी ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीच्या स्टॉकवर 1563.64 रुपये सरासरी लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. तर सात तज्ञांनी ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीचे शेअर्स पुढील एका वर्षात 1.200 रुपये पर्यंत जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. जर हा स्टॉक वरच्या दिशेने वाढला तर तो 1745 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. जर स्टॉक घसरला तर तो 1120 रुपयांवर जाऊ शकतो.

इंडिगो पेंट्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे 54 टक्के भाग भांडवल आहेत. परकीय गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 10.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. देशांतर्गत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी कंपनीचे शेअर्स 3.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीने मागील वर्षी मे महिन्यात आपल्या शेअर धारकांना 30 टक्के लाभांश वाटप केला होता.

मागील दोन वर्षात इंडिगो पेट्स कंपनीचे शेअर्स 2630.05 रुपयांवरून घसरुन 1040 रुपयांवर आले आहे. या दरम्यान हा स्टॉक 60 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. 5 फेब्रुवारी 2021 पर्यंत, इंडिगो पेंट्स कंपनीचे शेअर्स 2630.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर सप्टेंबर 2021 पर्यंत स्टॉक 2600 रुपयेवर आला होता. परंतु त्यानंतर शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव वाढला, आणि मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. यावर्षी आतापर्यंत ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांचे 20 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. ‘इंडिगो पेंट्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1746 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 991.25 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indigo Paints Share Price BSE 543258 NSE INDIGOPNTS on 23 March 2023.

हॅशटॅग्स

Indigo Paints Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x