26 November 2024 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Burnpur Cement Share Price | हा शेअर सध्या 5 रुपयांचा, पण रोज 20 टक्के वाढतोय, नेमकं कारण काय? फायदा घेण्यासाठी डिटेल्स वाचा

Burnpur Cement Share Price

Burnpur Cement Share Price | ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ या सिमेंट क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागत आहे. काल हा स्टॉक 20 टक्के वाढीसह 4.76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी हा स्टॉक 19.15 टक्के वाढीसह 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 38.27 टक्के वाढले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्यामागे म्हणजे कंपनीने दिग्गज कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’ सोबत एक व्यापारी करार केला आहे. या अंतर्गत दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या ऑफटेक कराराच्या अटी व शर्ती वाढवण्यात आल्या आहेत. याचा कंपनीला पुढील काळात नक्कीच फायदा होईल, असा विश्वास गुंतवणुकदारांना वाटत आहे, म्हणून हा स्टॉक तेजीत वाढतोय. (Burnpur Cement Limited)

जर तुम्ही ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, ‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2008 साली 53 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 5.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या काळात शेअर अक्षरशः 91 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 20.43 टक्के वाढले आहेत. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फक्त 6.67 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 11.11 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘बर्नपूर सिमेंट लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः सिमेंट उत्पादन करणारी कंपनी आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41 कोटी आहे. या कंपनीची स्थापना 1986 साली झाली. कंपनीने मागील काही वर्षात दिग्गज कंपन्या जसे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसोबत मोठे व्यापारी केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Burnpur Cement Share Price BSE 532931 on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Burnpur Cement Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x