27 November 2024 4:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने परतावा देणार, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: RVNL Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट कॅन्सल केल्यानंतर मिळणार 100% रिफंड, या नव्या फीचरमुळे युजर्सला होतोय फायदा IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड तपासून घ्या - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

Misuse of CBI & ED | सीबीआय, ईडीच्या एकतर्फी राजकीय कारवायांविरोधात देशातील 14 पक्ष सुप्रीम कोर्टात, 5 एप्रिलला सुनावणी

Misuse of CBI and ED

Misuse of CBI & ED | केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईविरोधात विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकवटले आहेत. एजन्सींचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत शुक्रवारी १४ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी ५ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. नुकतेच जवळपास 8 पक्षांच्या 9 नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यासंदर्भातील पत्रही दिले होते. काँग्रेस, आम आदमी पार्टी, जनता दल युनायटेड, भारत राष्ट्र समिती, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक आणि शिवसेना या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या पक्षांनी तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रकरणांमध्ये अटकेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली आहे. सरन्यायाधीशांनी राजकीय पक्षांच्या खटल्याच्या सुनावणीसाठी ५ एप्रिल ची तारीख निश्चित केली आहे.

काय म्हटले विरोधी पक्षांनी
सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा केवळ भाजपच्या विरोधकांना लक्ष्य करत असल्याचे पक्षांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याच्यावरील गुन्हे मागे घेतले जातात, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून एजन्सी स्वतंत्रपणे काम करत असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांची महत्वाची भूमिका
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात सर्व पक्षांना एकत्र आणण्यात ‘आप’चे प्रमुख केजरीवाल यांनी मोठी भूमिका बजावली आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्राचे मुख्य स्त्रोत मानले जात होते.

पंतप्रधानांना लिहिले होते पत्र
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतरही 8 पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केंद्रीय यंत्रणांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यावेळी काँग्रेसने या पत्रापासून स्वत:ला दूर ठेवले होते. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडी आणि सीबीआयने सिसोदिया यांना अटक केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Misuse of CBI and ED 14 political parties moved to supreme count check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

#Misuse of CBI and ED(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x