27 November 2024 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा JP Power Share Price | 17 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीचे, खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 1450% परतावा - NSE: JPPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK SIP Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची योजना, 2500 रुपयांची मासिक SIP देईल 1.18 करोड रुपये परतावा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, 32% कमाई होईल, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Horoscope Today | आजचा दिवस अनेक व्यक्तींसाठी आहे खास; काहींना करावं लागेल हे एक काम, दिवस आनंदात जाईल Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 2 दिवसात 20% वाढला, दुसरी अपडेट आली, स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: IDEA
x

Kalpataru Power Share Price | या शेअरने 17600 टक्के परतावा दिला, तज्ञ म्हणतात स्टॉक आणखी वाढेल, खरेदी करावा का?

Kalpataru Power Share Price

Kalpataru Power Share Price | सध्या शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आणि गोधळ आहे. मागील बऱ्याच काळापासून विविध नकारात्मक ट्रिगर मुळे शेअर्स बाजार कमजोर झाला आहे. अशा काळात कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी याबाबत संभ्रम आहे. मात्र आज या लेखात आम्ही तुम्हाला ज्या स्टॉक बद्दल माहिती देणार आहोत, त्याने दीर्घ काळात आपल्या गुंतवणुकदारांना 17600 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, त्याचे नाव आहे, ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’. (Kalpataru Power Transmission Limited)

‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने मागील 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. 28 मार्च 2003 रोजी बीएसई इंडेक्स या कंपनीचे शेअर्स 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के घसरणीसह 556.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या काळात ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17646 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी 2003 मध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 1.76 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.

मागील दहा वर्षात ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. 22 मार्च 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीच्या शेअरची किंमत 607.59 टक्के वाढली आहे. इतक्या परताव्यासह, ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना आता 7.07 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 6.63 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत 37.06 टक्के परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 48.89 टक्के वधारले आहेत.

सध्या ‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर 556.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तर पुढील काळात हा स्टॉक 640.20 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असे तज्ञ म्हणतात. सध्याच्या किंमत पातळीवर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत हा स्टॉक 15 टक्के परतावा देऊ शकतो. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 597.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 332.30 रुपये होती. या कंपनीचे बाजार भांडवल 9,076.68 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड’ कंपनी मागील तीन दशकांपूर्वी पासून अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करत आहे. केपीटीएल कंपनी मुख्यतः विशेष प्रकल्प जसे की, डिझाईन, टेस्टिंग, फॅब्रिकेशन, ट्रान्समिशन लाईन्सची उभारणी, तेल आणि गॅस इन्फ्रा आणि टर्नकी आधारावर रेल्वे प्रकल्प यांवर काम करते. KPTL कंपनी जगभरातील 63 देशांमध्ये आपल्या सेवा प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kalpataru Power Transmission Share Price BSE 522287 NSE KALPATPOWR on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Kalpataru Power Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x