27 November 2024 4:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | हा बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार करेल मदत; स्वतःचा व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवाल - Marathi News Home Loan Closer | होम लोन घेतलं असेल तर लक्ष द्या; क्लोज करताना काही महत्त्वाची कागदपत्र विसरू नका, महागात पडेल Penny Stocks | GTL कंपनीवर रिलायन्स ग्रुपची कृपा, पेनी शेअर रॉकेट होणार, कमाईची मोठी संधी - BSE: 513337 IREDA Share Price | मालामाल करणार इरेडा कंपनी शेअर, मिळेल 100% परतावा, कमाईची मोठी संधी - NSE: IREDA NBCC Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार मल्टिबॅगर NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC Post Office Scheme | 0% जोखीम आणि 100% सुरक्षित परतावा; 'या' योजनेत तुम्ही पैसे गुंतवले का, फायद्याची बातमी - Marathi News Sarkari Naukri | सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी; पगार 55000, अर्ज प्रक्रिया आणि इतर डिटेल्स जाणून घ्या - Marathi News
x

New Tax Regime | पगारदार टॅक्स पेयर्ससाठी खुशखबर! 7 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही, अपडेट पहा

New Tax Regime

New Tax Regime | नव्या करप्रणालीचा पर्याय स्वीकारणाऱ्या करदात्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आता सात लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर आकारला जाणार नाही. त्यासाठी वित्त विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे. सात लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नापेक्षा थोडे अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नावरच कर भरावा लागेल, अशी तरतूद या दुरुस्तीत करण्यात आली आहे. लोकसभेने वित्त विधेयक 2023 ला मंजुरी दिली आहे. यामध्ये दुरुस्तीच्या माध्यमातून नव्या करप्रणालीअंतर्गत करदात्यांना काहीसा दिलासा देण्यात आला आहे. नवी करप्रणाली १ एप्रिलपासून लागू होणार आहे.

या करदात्यांना मिळणार दिलासा
या तरतुदीचे स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, नवीन कर प्रणालीनुसार जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये असेल तर त्याला कोणताही कर भरावा लागत नाही. पण जर उत्पन्न ७,००,१०० रुपये असेल तर त्यावर २५,०१० रुपये कर भरावा लागतो. १०० रुपयांच्या या अतिरिक्त उत्पन्नामुळे करदात्यांना २५,०१० रुपयांचा कर भरावा लागतो. त्यामुळेच त्या व्यक्तीने भरलेला कर सात लाख रुपयांच्या करमुक्त उत्पन्नातून वाढलेल्या उत्पन्नापेक्षा अधिक असू नये, यासाठी किरकोळ दिलासा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अशा वेळी ७ लाखरुपयांपेक्षा जास्त उत्पन्न १०० रुपये असल्याने तेवढ्याच रकमेवर कर आकारण्यात यावा. टॅक्स तज्ज्ञांनी यांनी सांगितले की, ज्या करदात्यांचे उत्पन्न करमुक्त उत्पन्नापेक्षा किंचित जास्त आहे त्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी वित्त विधेयकात सुधारणा करण्यात आली आहे.

7 लाख रुपयांपर्यंत इनकम टॅक्स फ्री
2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली चा अवलंब करणाऱ्या करदात्यांना, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत आहे, त्यांना कर भरावा लागणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती. नोकरदार वर्गातील करदात्यांना नवीन कर प्रणाली चा अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Income Tax Return Filling

नव्या करप्रणालीत गुंतवणुकीवर सूट नाही
नव्या करप्रणालीत गुंतवणुकीवर कोणतीही सूट नाही. आता सरकारने वित्त विधेयकात दुरुस्ती करून या करदात्यांना आणखी काहीसा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सात लाखरुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना या सवलतीसाठी किती पात्र ठरतील, याचा उल्लेख सरकारने केलेला नाही. ज्या करदात्यांचे उत्पन्न ७ लाख २७ हजार ७ रुपयांपर्यंत आहे, अशा करदात्यांना या तरतुदीचा लाभ मिळू शकतो, असे करतज्ज्ञांनी म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: New Tax Regime finance bill to individuals earning marginally over Rs 7 lakhs rupees check details on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#New Tax Regime(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x