23 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Nykaa Share Price | 'नायका' कंपनीच्या शेअरची किंमत आणखी खोलात, शेअरची कामगिरी सुधारेल?

Nykaa Share Price

Nykaa Share Price | ‘FSN ई कॉमर्स व्हेंचर्स’ या फाल्गुनी नायर यांच्याद्वारे संचालित कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक बड्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ‘नायका’ कंपनीच्या पाच मोठ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मनोज गांधी, कंपनीचे चीफ कमर्शियल ऑपरेशन्स ऑफिसर-गोपाल अस्थाना, चीफ बिझनेस ऑफिसर, फॅशन डिव्हिजन हेड विकास गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी-घाऊक व्यवसाय, यांनी आपले पद सोडले आहे. (Fsn E-Commerce Ventures Limited)

याशिवाय नायका फॅशन डिव्हिजनच्या मालकीच्या ब्रँड व्यवसायाच्या उपाध्यक्षा ‘शुची पंड्या’ आणि फॅशन युनिटमधील फायनान्स हेड ‘लॅलित प्रुथी’ यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘नायका’ कंपनीच्या प्रवक्त्याने राजीनामा सत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले की, काही मध्यम स्तरीय कर्मचाऱ्याचे राजीनामे मानक वार्षिक मूल्यांकन आणि संक्रमण प्रक्रियेचा भाग आहेत. तर काहींनी खराब कामगिरीमुळे किंवा नवीन संधींच्या शोधात राजीनामे दिले आहेत.

‘नायका’ कंपनीचा IPO 2021 मध्ये शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO त्या वर्षातील यशस्वी आयपीओपैकी एक होता. ‘नायका’ कंपनीच्या IPO ची इश्यू किंमत 1125 रुपये प्रति शेअर होती, तर तहा स्टॉक 83 टक्के प्रीमियम किमतीवर म्हणजेच 2054 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीच्या शेअरने लिस्टिंग झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. मात्र त्यांनतर स्टॉक मध्ये पडझड सुरू झाली, आणि शेअरची किंमत अधिक खोलात गेली.

‘नायका’ कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात उलथापालथ अशा वेळी झाली आहे, जेव्हा कंपनीला प्रचंड वाढत्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत कोसळली आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 139.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘नायका’कंपनीचे एकूण बाजार भांडवल 39,306.72 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nykaa Share Price BSE 543384 on 25 March 2023.

हॅशटॅग्स

#Nykaa share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x